Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : स्वतःच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला पत्नीसह मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Spread the love

सोलापूर : स्वतःच्या १६ महिन्यांच्या चिमुकलीला दारू पाजून तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार करून नंतर अमानुषपणे खून केला आणि पत्नीच्या मदतीने गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोलापूरच्या विशेष न्यायालयाने राजस्थानी पती -पत्नीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. धोलाराम अर्जुनराम बिष्णोई (वय २६) आणि त्याची पत्नी पुनीकुमारी बिष्णोई (वय २०) अशी दोषी दाम्पत्याची नावे आहेत.


या खटल्याची अधिक माहिती अशी कि , आरोपी धोलारामा बिष्णोई व त्याची पत्नी पुनीकुमारी दोघेही मूळ राजस्थानचे असून ते मोलमजुरीसाठी तेलंगणात सिकंदराबाद येथे स्थायिक झाले होते. ३ जानेवारी २०२२ रोजी पहाटे आरोपी धुलीराम याने माणुसकीला आणि बाप लेकीच्या नात्याला कलंक लावीत विकृत मनोवृत्तीतून अवघ्या १६ महिन्यांच्या कोवळ्या मुलीला झोपेतून उठवून दारू पाजली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

या अत्याचाराने होणाऱ्या वेदना असहाय्य झाल्याने पीडित चिमुकली रडू लागली. त्यावर कळस म्हणजे धोलाराम याने तिचा आवाज बंद करण्यासाठी तिचा ओढणीने गळा आवळून अमानुषपणे खून केला. नंतर लगेचच धोलीराम व त्याची पत्नी पुनीकुमारी दोघेही मृत मुलीला कापडात गुंडाळून रेल्वेने राजस्थानला मूळ गावी जाण्याकरिता निघाले. वाटेत रेल्वेतील काही प्रवाशांना शंका आल्याने त्यांनी सोलापूर रेल्वे स्थानकात स्टेशन मास्तरकडे तक्रार केली. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी धोलीराम व पुनीकुमारीसह पीडित मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान पोलीस तपासात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पीडित चिमुकलीवर लैंगिक अत्याचार होऊन तिचा खून झाल्याचे आढळून आले. या गुन्ह्यात पुनीकुमारीने पती धोलीरामला मदत केल्याचे दिसून आले. त्यानुसार सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी धोलीराम व पुनीकुमारी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांनी या गुन्ह्याचा तपास केला.

या खटल्याचे विशेष असे कि , हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता. वैद्यकीय तपासणी, डीएनए चाचणी अहवाल आणि रासायनिक पृथःकरण अहवाल महत्त्वाचा ठरला. ३१ साक्षीदार तपासण्यात आले. यातील काही साक्षीदार राजस्थान, सिकंदराबाद आणि वाडी (कर्नाटक ) येथील असल्याने त्यांची साक्ष ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्यात आली आणि आरोपी पती पत्नीला कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

Click to listen highlighted text!