Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : बॉलिवूड चे प्रसिद्ध गायक के के उर्फ कृष्णकुमार यांचे निधन …

Spread the love

कोलकाता : प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक केके ऊर्फ कृष्णकुमार कुण्ठ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. केके हे कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. मात्र, या कॉन्सर्टनंतर त्यांची तब्येत बिघडली आणि ते अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूसमयी ते ५३ वर्षांचे होते.


या कार्यक्रमात त्याने गायलेले “हम रहे या ना रहे कल… पल याद आयेंगे पल…” हे गीत घटनाच व्हिडीओ उज्वल रॉय या त्यांच्या चाहत्याने ट्विट केला आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमातील ‘तडप तडप के इस दिल से’ हे त्यांचं गाणं लोकप्रिय झालं होतं.

https://twitter.com/ujjwalroy06/status/1531711419980210177


पार्श्वगायक केके यांच्या निधनाबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांचे निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले आहे. कोलकाता येथील नजरुल मंच येथे एका मैफिलीत परफॉर्म करत असताना त्यांना प्रारंभी  अस्वस्थ वाटू लागल्याने ते  एस्प्लानेडमधील त्याच्या हॉटेलमध्ये परतले तरीही त्यांचा त्रास कमी झाला नाही. रात्री 10:30 च्या सुमारास त्यांना  कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (CMRI) नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मात्र, त्यांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी काहीही माहिती सांगितलेली नाही. केके यांच्या शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण अधिकृतपणे स्पष्ट होणार आहे. बुधवारी सकाळी त्याची पत्नी आणि मुलं कोलकात्यामध्ये दाखल होणार आहेत. मागील दोन दिवसांत केकेने कोलकात्यात दोन कॉन्सर्ट केले होते.

केके यांची बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांमध्ये गणती होत असे. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आतापर्यंत त्यांनी २०० हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत. ९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या यारो या गाण्याने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. केके यांनी रोमॅण्टिक गाण्यांसह पार्टी साँगपर्यंतची सर्व गाणी गायली आहेत.

‘प्यार के पल’, ‘यारों’, ‘ओ मेरी जान’ यांसारख्या गाण्यांसाठी स्मरणात राहणारे केके यांच्या आकस्मिक निधनाबद्दल कोलकाता येथील अनेक गायकांनी शोक व्यक्त केला आहे. केके, एक अष्टपैलू गायक होते , २३ ऑगस्ट १९६८ रोजी त्यांचा जन्म झाला होता. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगालीसह  इतर अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायिली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांची श्रद्धांजली

केके यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह  बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आणि गायकांनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्ता यांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘केकेसर या जगात नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही’, अशा शब्दात गायक अरमान मलिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला असून आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि ,  “केके नावाने प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या गाण्यांमधून सर्व वयोगटातील लोकांच्या मनाला भिडलेल्या विविध भावनांचे प्रतिबिंब दिसून आले. त्यांच्या गाण्यांमधून त्यांची नेहमी आठवणराहील. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि चाहत्यांसाठी शोक व्यक्त करतो. ओम शांती,” त्याने लिहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!