Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : गाजलेल्या जवखेडा तिहेरी खून प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता

Spread the love

अहमदनगर : राज्यात गाजलेल्या जवखेडे तिहेरी हत्याकांडातील तिन्ही आरोपींची सबळ पुराव्याअभीवा निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडेमध्ये आठ वर्षांपूर्वी हे हत्याकांड घडले होते. भाऊ, त्याची पत्नी आणि मुलाची हत्या केल्याप्रकरणी तिघा पिता-पुत्रांना अटक करण्यात आली होती.


संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव, सुनील संजय जाधव या एकाच अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील तीन जणांच्या हत्येप्रकरणी प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव आणि दिलीप जगन्नाथ जाधव या तिघांना अटक करण्यात आली होती. जिल्हा प्रधान न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्ष आरोप सिद्ध करू शकले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

राज्याला हादरवणारं जवखेडे हत्याखंड

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे २०१४ साली संजय जाधव (वय ४२), त्यांची पत्नी जयश्री (३८) व मुलगा सुनील (१८) अशा तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना समोर आल्यानंतर जवखेडेसह संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि राज्यात प्रचंड तणाव होता. अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील तिघांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!