Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime Update : गुन्हेगाराचे रिव्हाॅल्वर विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक

Spread the love

औरंगाबाद  : पोलिसांच्या खबर्‍यालाच रिव्हाॅल्वर खरेदी करायची आॅफर दिली अन आरोपी रिव्हाॅल्वर व ५ जिवंत काडतूसासहित गुन्हे शाखेने सोमवारी संध्याकाळी ७ वा.शिवाजी नगरात जेरबंद केला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दिनेश बताडे(२१) रा. रेणूकानगर शिवाजी नगर असे अटक आरोपीचे नाव आहे.तो पेंटींगचे काम करतो.


याचा मोठा भाऊ दिपक बताडे (२४) हा प्रेयसीच्या आईच्या खुन प्रकरणात चिकलठाणा पोलिसांनी अटक केला आहे. मुकुंदवाडीतील सुशीला पवार यांचा ८ मे २२ रोजी दिपक बताडे ने साथीदाराच्या मदतीने बाळापूर शिवारात खून केला होता. दिपक बताडे अटक झाल्यानंतर त्याने घरात रिव्हाॅल्वर दडवून ठेवले होते. याची माहिती त्याचा लहान भाऊ दिनेश बताडे ला होती. याची त्याला सारखी भिती वाटायची.म्हणून ते रिव्हाॅल्वर त्याने विक्रीसाठी गिर्‍हाईक शोधले खरे पण तो पोलिसांचा खबर्‍या निघाला अन दिनेश बताडे गस्तीवरील गुन्हेशाखेच्या तावडीत रिव्हाॅल्वरसहित सापडला.

पोलिसांच्या माहितीनुसार या रिव्हाॅल्वरची किंमत ९१हजार रु आहे.सेव्हनहिल्स परिसरात सोमवारी संध्याकाळी ६च्या सुमारास पीएसआय अमोल म्हस्के, अजित दगडखैर,गस्तीवर असतांना त्यांना खबर्‍याने रिव्हाॅल्वर विक्री करण्यासाठी एक इसम शिवाजीनगर परिसरात फिरत असल्याची माहिती दिली.त्यानुसार सापळा रचंत दिनेश बताडे ला अग्निशस्रासह अटक केली.

वरील दोन्ही आरोपी पाथर्डी परिसरातील रहिवासी असून लहानपणी वडील मृत्यू पावल्यानंतर दोनवर्षांपासून शहरात कामधंदा करण्यासाठी राहात होते.अशी माहिती पोलिस तपासात उघंड झाली आहे.

वरील कारवाई पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल म्हस्के,पीएसआय अजित दगडखैर,पोलिस कर्मचारी जितेंद्र ठाकूर, संजयसिंह राजपूत,नवनाथ खांडेकर, ओमप्रकाश बनकर यांनी पार पाडली.या प्रकरणी पुढुल तपास पुंडलिकनगर पोलिस करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!