Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : मोठी बातमी : नेपाळच्या विमान अपघातात ठाण्याच्या चौघांसह २२ जणांचा मृत्यू

Spread the love

काठमांडू : नेपाळच्या पोखरा येथून रविवारी 22 प्रवाशांना घेऊन उडालेले तारा एअरच्या  बेपत्ता झालेल्या विमानाला अपघात झळा असून यामध्ये २२ प्रवासी ठार झाले आहेत. यामध्ये मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा तर जपानमधील तीन नागरिकांचा समावेश आहे. नेपाळ लष्कराने नेपाळच्या मुस्तांग भागात क्षतिग्रस्त झालेले हे विमान शोधले असून आतापर्यन्त १४ जणांचे मृतदेह लष्कराने हस्तगत केले आहेत. नेपाळमधील मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 येथील सनोसवेअर येथे या दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत.


नेपाळच्या लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल नारायण सिलवाल यांनी विमानावर क्रमांक स्पष्टपणे दिसत असलेल्या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषाच्या फोटोसह ट्विट केले आहेत. नेपाळ सैन्याच्या बचाव दलाकडून सध्या तपास आणि बचाव कार्य सुरु आहे.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार नेपाळच्या ‘तारा एअर’च्या ट्विन ऑटर 9N-AET विमानाने पोखरा येथून सकाळी 09.55 वाजता उड्डाण केले होते. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार  सदर विमानाच्या उड्डाणानंतर 15 मिनिटांनी विमानाचा कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला. यानंर विमान बेपत्ता झाले. दरम्यान लष्कराने हाती घेतलेल्या शोधमोहिमेनुसार नेपाळमध्ये पोखरा ते जोमसोम या ठिकाणी जात असलेल्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले.

मुंबईतील एकाच कुटुंबातील चार प्रवासी

या विमानात चार भारतीय प्रवाशांसोबत एकूण 22 प्रवासी प्रवास करत होते. यामधील चारही भारतीय प्रवासी हे मुंबईतील एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी असे  या चार भारतीय प्रवाशांची नावे आहेत. हे कुटुंब मुंबईजवळील पोलीस ठाण्यात राहणारे होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, वैभवी त्रिपाठीच्या मोठ्या बहिणीने अधिकाऱ्यांना तिच्या आईची तब्येत खराब असल्याने ही माहिती त्यांना देऊ नये असे सांगितले आहे.

भीषण अपघात , मृतांची ओळख पटवणे अवघड

आता या अपघातग्रस्तविमानाचे फोटो समोर आले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की या विमानाचे पूर्णतः तुकडे झाले. दरम्यान, रेस्क्यू टीम आणि नेपाळी मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व 22 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक लोकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, विमान मानपती हिमालय भूस्खलनात लामचे नदीच्या मुखाशी कोसळले आहे. नेपाळचे पत्रकार गौरव पोखरेल यांनी या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आहेत.

या अपघाताबद्दल अधिक माहिती देताना लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळ लष्कर जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळाकडे जात असून  रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सैन्यदलासह स्थानिक लोकही मदत करत आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे. अपघातात ज्या भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ते चौघेही महाराष्ट्रातील ठाण्याचे रहिवासी होते. नेपाळचे  प्रवक्ते देव चंद्रलाल करन यांनी दुर्घटनेच्या एका दिवसानंतर एएफपीला सांगितले की, आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे. हवामान खूपच खराब आहे पण आमची टीम अपघातस्थळी पोहोचली आहे. दुसर्‍या फ्लाइटची शक्यता नाही.”

नेपाळमध्ये जगातील 14 पैकी 8 उंच पर्वत आहेत. यामध्ये एव्हरेस्टचाही समावेश आहे. येथे विक्रमी विमान अपघात घडतात. 2016 मध्ये, त्याच एअरलाइनचे विमान त्याच मार्गावर टेक ऑफ केल्यानंतर क्रॅश झाले होते, त्यात सर्व 23 लोकांचा मृत्यू झाला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!