Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SambhajiRajeNewsUpdate : छ्त्रपती संभाजीराजे यांची बिकट वाट , उद्या जाहीर करणार भूमिका

Spread the love

एकमेव अपक्ष आमदार महेश बालदी संभाजीराजे यांना सूचक म्हणून पाठिंब्याचे पत्र देताना…

मुंबई : छत्रपती संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक लढणार की त्यातून माघार घेणार या विषयी उद्या सकाळी ११ वाजता मुंबईच्या मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन ते स्वतः आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सूचक म्हणून अद्याप १० आमदारही मिळू शकले नाहीत. या परिषदेला राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


दरम्यानच्या काळात संभाजीराजे छत्रपती यांनी आपण राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे  स्पष्ट करून राज्यातील आमदारांनी आपल्याला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांना विजयासाठी ४२ आमदार हवे आहेत पैकी त्यांना आतापर्यंत  रायगड जिल्ह्यातील उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी  यांनी सूचक म्हणून सही दिली आहे तर मनसेचे आ. राजू पाटील यांनी त्यांना पाठिंबा देण्यास उत्सुक आहोत असे म्हटले आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसनेनेने  महाविकास आघाडी पुस्क्रुत उमेदवार म्हणून आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र  शिवसेनेने त्यांना शिवबंधन हातात बांधण्याची ऑफर दिली होती मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पावर्यांना उमेदवारी दिली आहे. त्यानुसार आज दुपारी संजय पवार आणि संजय राऊत या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. भाजपने त्यांची तिसरी जागा लढवली तरी शिवसेनेचा उमेदवारच निवडून येणार असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

या सर्व घडामोडींनंतर संभाजीराजेंनी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करुन आपली भूमिका जाहीर करु असे म्हटले होते. त्यानुसार  गेल्या दोन दिवसांपासून संभाजीराजे विविध लोकांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. आता संभाजीराजे छत्रपती नेमकी काय भूमिका घेणार, ते निवडणूक लढणार की माघार घेणार हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.

कुणाचे किती आमदार ?

राज्याच्या विधानसभेतील २८८ आमदारांना पैकी विधानसभेत शिवसेनेचे ५५ आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या पहिल्या उमेदवाराला ४२ मतांचा कोटा दिल्यानंतर त्यांच्याकडे १३ मते शिल्लक राहतात काँग्रेसचे ४४ आमदार असून त्यांच्या एका उमेदवाराला ४२ मते दिल्यानंतर त्यांची २ मते उरतात तर राष्ट्रवादीकडे ५३ मते असून त्यांच्या उमेदवाराला ४२ मध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे ११ मते शिल्लक राहतात त्यामुळे महाविकास आघाडी कडे तीन पक्ष्यांचे मिळून २६ मते  अतिरिक्त आहेत त्यामुळे शिवसेनेला आपला सहावा उमेदवार विजयी करण्यासाठी आणखी १६ मतांची गरज आहे.  या १६ मतांसाठी शिवसेनेला अपक्ष आणि छोट्या पक्षांची मदत घेणे गरजेचे आहे.

इतर आमदारांची संख्या अशी आहे …

विधानसभेत १३ अपक्ष उमेदवार आमदार असून छोट्या पक्षांचे १६ आमदार आहेत या अपक्ष आमदारांपैकी ५ अपक्ष आमदार भाजप समर्थक आहेत तसेच जनसुराज्य पक्ष एक आणि राष्ट्रीय समाज पक्ष  यांचे २ आमदार भाजप कडे आहेत. त्यामुळे  भाजप १०६ अपक्ष ५ आणि छोटे पक्ष २असे  एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत.

याशिवाय १३ अपक्ष आमदारांपैकी ८ अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षाच्या १४ आमदारांचा दुसऱ्या जागेसाठी पाठिंबा मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.  छोट्या पक्षाच्या  १४ मध्ये मनसेचा १ आमदार भाजपला मदत करू शकतो तर एमआयएमचे २ आमदार कुणाला मतदान करतील ? हे अद्याप सांगता येत नाही. छोट्या पक्षांमध्ये  बहुजन विकास आघाडी ३,  समाजवादी पक्ष २,  प्रहार जनशक्ती २,  मनसे १ मार्क्सवादी कम्युनिस्ट १ शेतकरी कामगार पक्ष १ स्वाभिमानी पक्ष १ राष्ट्रीय समाज पक्ष १ जनसुराज्य शक्ती पक्ष १ क्रांतिकारी शेतकरी पक्ष १ असे १६ आमदार छोट्या पक्षांचे आहेत तर अपक्ष १३ आमदार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!