Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : घराणेशाहीपासून मुक्ती हा संकल्प , पंतप्रधानांचा केसीआरवर निशाणा

Spread the love

हैदराबाद (तेलंगणा) : तेलंगणातील टीआरएस सरकारवर हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, जेव्हा एका कुटुंबाला समर्पित पक्ष सत्तेवर येतात तेव्हा त्या कुटुंबातील सदस्य भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा चेहरा बनतात. राज्यातील एका जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, “राजकीय घराणेशाहीमुळे देशातील तरुणांना, कलागुणांना राजकारणात येण्याची संधीही मिळत नाही. अशा तरुणांच्या प्रत्येक स्वप्नाचा चुराडा करून त्यांना राजकारणात येण्यासाठी दारे  बंद केली जातात. घराणेशाहीपासून मुक्ती , कौटुंबिक पक्षांपासून उक्ती  हा 21 व्या शतकातील भारताचा संकल्प आहे.”

कौटुंबिक पक्ष केवळ स्वत: ला समृद्ध करतात

आपल्या भाषणात पंतप्रधान  म्हणाले कि , “तेलंगणातील लोक हे पाहत आहेत की जेव्हा एका कुटुंबाला समर्पित पक्ष सत्तेवर येतात, तेव्हा त्या कुटुंबातील सदस्य भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा चेहरा बनतात. तेलंगणातील लोक हे पाहत आहेत की कुटुंबातील पक्षच स्वत:ची भरभराट करतात. आणि तिजोरी भरतात. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की जेव्हा राजकीय घराणेशाही सत्तेतून काढून टाकली जाते तेव्हा तेंव्हा  विकासाचे मार्ग उघडतात. आता ही मोहीम पुढे नेण्याची जबाबदारी माझ्या तेलंगणातील बंधू-भगिनींची आहे.

सत्तेत अनेक कुटुंबीय

केटी रामाराव, तेलंगणाच्या मुख्यमंत्री कलवकुंतला चंद्रशेखर राव यांचे पुत्र, सिरसिल्लाचे आमदार आहेत आणि ते आयटी, नगरपालिका प्रशासन आणि शहरी विकास मंत्री आहेत. त्याच वेळी, केसीआर यांची मुलगी कविता यांनी निजामाबादमधून खासदार म्हणून काम केले आहे आणि सध्या 2020 पासून विधान परिषद, निझामाबादच्या सदस्या म्हणून काम करत आहे. तर केसीआर यांचे पुतणे हरीश राव हे सिद्धीपेटचे आमदार आहेत आणि तेच  तेलंगणाचे अर्थमंत्री आहेत.

इकडे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या चार महिन्यांत दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे टाळले आहे. कारण गुरुवारी ते माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि त्यांचा मुलगा जेडीएसचे एचडी कुमारस्वामी यांची भेट घेण्यासाठी बेंगळुरूला गेले होते. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आज हैदराबादमध्ये असल्याची माहिती आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!