Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : बार्टीतर्फे मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

Spread the love

हिंगोली/ प्रभाकर नांगरे : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे जिल्हा हिंगोली च्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या स्वयं सहाय्यता युवा गटाकरिता व अनुसूचित जाती च्या युवकांना एक महिना निःशुल्क अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.


सदरील प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक ६ जून २०२२ ते ५ जुलै २०२२ पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,हिंगोली येथे आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये उद्योजकिय व्यक्तिमत्त्व विकास, कारखाना भेटी, उद्योगाला लागणारे विविध नोंदणी व परवाने, स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना, मेक इन इंडिया, यशस्वी उद्योजक समवेत चर्चा, उद्योग उभारणी, बाजारपेठ सर्वेक्षण, उद्योग निवड प्रक्रिया,प्रकल्प अहवाल निधी उभारणी, स्टँडअप इंडिया, शासनाचे औद्योगिक धोरण, डिजिटल मार्केटिंग, कृषी योजनांची माहिती, इत्यादी विविध क्षेत्रातील उद्योग संधी विविध कार्यालय व महामंडळाच्या कर्ज योजना, याबदल माहिती मिळणार आहे.

प्रशिक्षणास निवड होण्यासाठी किमान ८ वी पास ची पात्रता लागू आहे. ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येईल, प्रशिक्षणार्थी ला उद्योग करण्याची प्रबळ इच्छा असावी तसेच प्रशिक्षण कालावधीत पूर्ण वेळ उपस्थीत राहण्याची तयारी असावी. त्यासाठी एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम दिनांक 27 मे 2022 रोजी सामाजिक न्याय भवन हिंगोली येथे सकाळी ११.०० वाजता उपस्थीत राहून नोंदणी करून निवड प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन सहाय्यय आयुक्त शिवानंद मिनगिरे बार्टी प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे व एम.सी.ई.डी.प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!