Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : खून झाल्याची थट्टा महागात पडली , पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Spread the love

औरंगाबाद : पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून आज सकाळी राहूल नगरातील एका व्यक्तीने खून झाल्याची माहिती देऊन पोलिसांसोबत थट्टा केली. या प्रकरणी सातारा पोलिसांनी दारुड्यावर गुन्हा दाखल केला. आधीच खून प्रकरणांना औरंगाबाद हादरून गेलेले असताना अशी थट्टा , मस्करी केल्यामुळे पोलीस चांगलेच संतप्त झाले होते.  

या बाबत पोलिसांनी दिलेलय माहितीनुसार सोनेश चद्रकांत बनसोडे रा.राहूलनगर असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. नियंत्रण कक्षाला आज सकाळी साडेआठच्या सुमारास आरोपीने फोन करुन राहूल नगरात खून झाल्याची माहिती दिली. राहूलनगर हा परिसर सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे नियंत्रण कक्षाने तशी माहिती सातारा पोलिसांना कळवताच  पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान पोलिस घटनास्थळी रवाना झाल्यानंतर राहूल नगरात तसा कोणताही प्रकार न घडल्यामुळे आरोपीने पोलिसांची थट्टा – मस्करी केल्याचे उघंड झाले या प्रकरणी सातारा पोलिसांनी पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या आदेशावरुन आरोपी बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसात तिन अपघाती गुन्हे

औरंगाबाद – शहरातील छावणी व वाळूज पोलिस ठाण्यात दोन दिवसात तीन अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे.१४मे रोजी वाळूज जवळील लांझी परिसरात दोन मोटरसायकलच्या धडकेत घडलेल्या अपघातात आनंद शिंदे(२२) रा.तुर्काबाद खराडी हा तरुण गंभीर जखमी झाला व त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर आज वाळूज पोलिस ठाण्यात अपघातातील आरोपी संतोष मोरे विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

छावणी पोलिस ठाण्यात दाखल असलेला अपघात हा १८मे रोजी घडला होता. त्यातील जखमी मोतीलाल गोसावी(७०) यांचा काल उपचारा दरम्यान मृत्यू झाला.१८तारखेला अज्ञात कारच्या धडकेत गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.
तर पुन्हा वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५मे रोजी संध्याकाळी घडलेल्या दुसर्‍या अपघातात प्रभाकर व्यंकटेश कुलकर्णी(५१) यांचा अपघाती मृत्यू झाला.याप्रकरणी दुसरा गुन्हा वाळूज पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. वरील तिन्ही प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले व शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!