Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaNewsUpdate : अपघाताचे बोगस क्लेम , वकीलाचा अटकपूर्व जामिन फेटाळला, सीआयडीने ठोकल्या बेड्या…

Spread the love

औरंगाबाद – अपघाताचे प्रकरण हाताळणार्‍या वकीलाने बोगस कागदपत्राद्वारे क्लेम मिळवून देण्याचा प्रयत्ना प्रकरणी सीआयडीने सोमवारी अटक केली. अॅड.विजयदत्त पाटील असे अटक आरोपीचे नाव आहे. या आरोपीचा अटकपूर्व जामिन उस्मानाबाद न्यायालयाने फेटाळल्या नंतर आरोपी अॅड.पाटील ने खंडपीठात धाव घेतली.न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठाने आरोपीचे रेकाॅर्ड तपासल्यानंतर जानेवारी २०२२मधे हा तपास उस्मानाबाद पोलिसांकडून सीआयडीकडे देण्याचे आदेश दिले होते.

या तपासात मयत मधू घोडके यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात आरोपी अॅड.विजयदत्त पाटील याने घोडके कुटीटुंबियांना बोगस कागदपत्रे तयार करण्याचे सांगितल्याची साक्ष मयताच्या नातेवाईकाने खंडपीठात दिली.

आरोपीने २०१९पासून अंदाजे २७५बोगस प्रकरणांचे क्लेम मोटार परिवहन विभागाकडून मिळवून दिल्याचे उस्मानाबाद पोलिसांच्या तपासात उघंड झाले होते.आणखी बरीच प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता सीआयडीने वर्तवली आहे.
२०१९साली मधू लक्ष्मण घोडके यांच्या अपघाती मृत्यूनंतर वकील विजयदत्त पाटील याचे बोगस प्रकरणे उघडकीस आली आहेत.पण घोडके प्रकरणात सीआयडीने अडॅ.पाटील याला अटक केली.

याचिकाकर्त्या आरोपी तर्फे अॅड. एस.जे. साळुंके यांनी काम पाहिले.तर शासनाच्या वतीने अॅड.व्ही.बी. विर्धे यांनी कामकाज पाहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!