Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पुन्हा एकदा नामांतर : नवनिर्मित जिल्ह्याला डॉ.आंबेडकरांचे नाव दिल्याने हिंसक आंदोलन , मंत्र्याचे घर पेटवले ….

Spread the love

हैद्राबाद : आंध्रप्रदेशात नव्याने तयार करण्यात आलेल्या कोनासीमा जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते. या नामांतराला विरोध म्हणून जिल्ह्यात हिंसाचार सुरु झाल्याचे वृत्त असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जारी केली आहे. या आंदोलनात एका मंत्र्याच्या घराला आंदोलकांनी आग लावून दिली.


या विषयीची अधिक माहिती अशी कि , आंध्रप्रदेशमधील कोनासीमा या नवीन निर्माण करण्यात आलेल्या जिल्ह्याला  ४ एप्रिल रोजी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनासीमा जिल्हा” असे  नाव देण्यात आले आहे. दरम्यान या जिल्ह्याचे  नाव बदलण्यास विरोध असलेल्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आल्यानंतर या मोर्चाला हिंसक वळण लागले. या आंदोलनात आंदोलकांनी सरकारी बस पेटवून देत परिवहन मंत्री पी. विश्वरुप यांच्या घराला आग लावली. दरम्यान पोलिसांनी मंत्री विश्वरुप आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढले.अमलपुरममध्ये हि घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. या नामांतराला विरोध करण्यासाठी कोनासीमा साधना समिती नामक संघटनेची स्थापना करण्यात अली असून या संघटनेच्या कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची चांगलीच झटपट झाली.

आंध्रप्रदेशमध्ये कोनासीमा या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने  या जिह्याचा नामविस्तार डॉ. बीआर आंबेडकर कोनासीमा असा केला होता. दरम्यान राज्यातील काही समुदायाच्या संघटनांनी याला विरोध करीत आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले  असून काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली आहे. तर, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आंदोलकांनी मंत्री  विश्वरुप यांचे  घर पेटवून दिले आहे.

आंदोलकांची दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज

कोनासीमा जिल्हा साधना समितीच्यावतीनेच या  मोर्चाचे आयोजन करण्यात आले  होते. शहरातील क्लॉक टॉवर जंक्शनजवळून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले तेंव्हा  पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. त्यापैकी काही आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने  निघाले होते. दरम्यान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुब्बा रेड्डी आंदोलनाच्या ठिकाणी गेले असता त्यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.

विशेष म्हणजे आंध्र प्रदेश सरकारने कोनासीमा जिल्ह्याचे नाव “डॉ. बी.आर.आंबेडकर कोनासीमा जिल्हा” असे केल्यानंतर कोणाचा या निर्णयावर काही आक्षेप असल्यास  ३० दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्याचे  आवाहन करण्यात आले  होते. तरीही जिल्ह्यातील काही युवकांच्या संघटनांनी नामांतराला खुला विरोध करीत जिल्ह्याचे  नाव “कोनासीमा” च  ठेवण्याची मागणी केली होती.

काही राजकीय पक्षांनी भडकावल्याचा आरोप

या आंदोलनावर बोलताना राज्याच्या गृहमंत्री तानेती वनिता यांनी काही राजकीय पक्ष आणि समाजकंटकांनी आंदोलकांना भडकवल्याचा आरोप केला आहे. मीडियाशी बोलताना त्या म्हणाल्या की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेत आतापर्यंत 20 पोलीस जखमी झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरात पोलिसांच्या एक व्हॅन आणि शिक्षण संस्थेच्या बसला देखील आग लावण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात शांतता राखण्याचे आवाहन देखील त्यांनी या वेळी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!