Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : कोटक बँकेच्या लॉकरमधून ३१ लाखांचे दागिने गायब

Spread the love

औरंगाबाद :आफ्रिकेमधे नोकरीनिमित्त वास्तव्य असलेल्या नागरिकाचे कोटक महिंद्रा बॅंकेच्या लाॅकरमधून ३१ लाखांचे दागिने गायब झाल्याचा गुन्हा पोलिसआयुक्तांच्या आदेशावरुन क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुरैयाअली असगर गिरणीवाला (४०) रा.बुर्‍हाणीकाॅलनी घाटी रोड या फिर्यादी आहेत. २२ एप्रिल ते ९मे २२ या काळात वरील गुन्हा घडल्याची तक्रार त्यांनी क्रांतीचौक पोलिसांना दिली. त्यांचे पती आफ्रिकेत काम करतात. २०१०साली त्यांनी शहरातील कोटक बॅंकेत खाते उघडले. त्याच सोबत घरातील दागिने व रोकड ठेवण्यासाठी लाॅकरसुविधा बॅंकेकडून उपलब्ध करुन घेतली. त्यामधे सोन्याच्या बांगड्या, ब्रासलेट, कानातले रिंग, टाॅप्स, सोन्याची नाणी व ३हजार रु.परकीय चलन ठेवण्यात आले होते.

दरम्यान गुन्हा घडल्याच्या काळात फिर्यादी आजारी असल्यामुळे त्यांच्या बॅंक लाॅकरच्या चाव्या त्यांनी पतीच्या सांगण्यावरुन जावेकडे ठेवण्यास दिल्या होत्या. दरम्यान ९ मे रोजी वरील लाॅकर मधून ३१ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल गायब केल्याचा आरोप फिर्यादी यांनी बॅंक व्यवस्थापक हिरल शहा, कर्मचारी सायली घाडगे, जाऊ फातेमा मोहम्मद गिरणीवाला यांच्यावर लावला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ठुबे करंत आहेत.

इलेक्र्टिक शाॅक लागून लहानगा दगावला

औरंगाबाद -हर्सूल परिसरातील एकतानगरातआज दुपारी १२.३०वा. टॅरेसवरील गॅलरीत खेळत असतांना लाईटचा शाॅक लागून दगावला. आदित्य सूरज साबळे (०९) असे मयताचे नाव आहे. शाॅक लागल्यांतर उपचारासाठी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले असता दुपारी ३.२०ला.त्याचामृत्यू झाला.पुढील तपास पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखालीहर्सूल पोलिस करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!