Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PM Narendra Modi News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानला रवाना

Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी जपानला दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहे. या दौऱ्यात ते प्रभावशाली गटातील सदस्य देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित क्वाड लीडर्स समिट (क्वॉड समिट 2022) मध्ये सहभागी होणार आहेत.


दरम्यान या शिखर परिषदेमुळे चार सदस्य देशांच्या नेत्यांना क्वाड उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी मिळेल, असे मोदींनी एका निवेदनात म्हटले आहे. २४ मे रोजी टोकियो येथे होणाऱ्या शिखर परिषदेत मोदींशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेसे सहभागी होणार आहेत.

या दौऱ्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीट केले आहे की, “ विश्व कल्याणाची शक्ती पुढे नेण्याचा हा पंतप्रधानांचा प्रवास असून  पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियोसाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ट्यान्कगी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानेसे, जपानचे पंतप्रधान किशिदा आणि अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांच्याशी चर्चा होणार आहे.

शिखर परिषदेच्या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी, बायडन, किशिदा आणि अल्बानेसे यांच्याशी स्वतंत्र द्विपक्षीय बैठक ही घेणार आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, “जपानमध्ये मी क्वाड नेत्यांच्या दुसर्‍या वन-ऑन-वन ​​शिखर परिषदेत सहभागी होणार आहे, ज्यामुळे चार क्वाड देशांच्या नेत्यांना क्वाड उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी मिळेल. आम्ही इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडी आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवरही ते विचार विनिमय करतील.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ मे रोजी टोकियो येथे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. यादरम्यान दोन्ही नेते युक्रेन संकटावरही चर्चा करतील. दरम्यान, युक्रेनवरील रशियन हल्ल्याला ज्या दिवशी ४ महिने पूर्ण होत आहेत, त्याच दिवशी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भेट होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!