Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalNewsUpdate : राज्याच्या पेट्रोल – डिझेल दर कपातीवरून देवेंद्र फडणवीस यांची पुनश्च टीका …

Spread the love

मुंबई : “लज्जास्पद” असे हेडिंग देत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या इंधनकपातीवर ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे . आपल्या ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटले आहे कि ,  ‘राणाभीमदेवी’ थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.


केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली. महाराष्ट्र शासनाच्या डीजीआयपीआर ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली. मात्र सरकारने प्रत्यक्षात असा कोणताच निर्णय घेतला नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

…तर राज्याचा कर आपोआप कमी होतो!

इंधनाची मूळ किंमत, विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन, रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अ‍ॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सरकारने मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ केलं!

महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे. कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!