Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : जगप्रसिद्ध कुतुबमिनार बाबत केंद्र सरकारने केला मोठा खुलासा…

Spread the love

नवी दिल्ली : रविवारी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जीके रेड्डी यांनी दिल्लीतील कुतुबमिनारच्या परिसरात उत्खननाबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. खरे तर, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, सांस्कृतिक मंत्रालयाने ऐतिहासिक कुतुबमिनार परिसरातील मुर्त्यांची ‘आईकॉनोग्राफी’  तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच कुतुबमिनारच्या दक्षिणेला मशिदीपासून १५ मीटर अंतरावरही उत्खनन सुरू करता येईल. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) उत्खनन सुरू करून सांस्कृतिक मंत्रालयाला अहवाल द्यावा, असे सांगण्यात आले.


कोणताही निर्णय घेतला नाही

मात्र, यासंदर्भात एएनआयशी बोलताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी असे काही करण्याचा मंत्रालयाचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. खरं तर, सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी शनिवारी या स्मारकाला भेट दिली होती, त्यानंतर अशा बातम्या येऊ लागल्या की कुतुबमिनार कुतुबुद्दीन ऐबकने बांधला होता की चंद्रगुप्त विक्रमादित्यने हे शोधण्यासाठी ASI ला उत्खनन करण्याचे आदेश दिले आहेत.

तथापि, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या संपूर्ण प्रकरणात मंत्रालयाने सांगितले की, अधिका-यांनी नियमितपणे साईटला भेट दिली आहे. आतापर्यंत उत्खननाबाबत तसा निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे, दिल्ली न्यायालयाने गेल्या महिन्यात ASI ला पुढील निर्देशापर्यंत कुतुबमिनार संकुलातून गणेशाच्या दोन मूर्ती न काढण्याचे निर्देश दिले होते.

27 हिंदू आणि जैन मंदिरे पाडण्यात आली

जैन देवता तीर्थंकर भगवान ऋषभ देव यांच्या वतीने वकील हरी शंकर जैन यांनी दाखल केलेल्या दाव्यावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. मोहम्मद घोरी आणि कुव्वत-उल-इस्लामच्या सैन्यातील सेनापती कुतुबुद्दीन ऐबक यांनी 27 मंदिरे अंशत: पाडल्याचा दावा या खटल्यात करण्यात आला होता. साहित्याचा पुनर्वापर करून आवारात मशीद बांधण्यात आली.

विशेष म्हणजे, अलीकडेच विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) प्रवक्ते विनोद बन्सल यांनीही कुतुबमिनार हा प्रत्यक्षात ‘विष्णू स्तंभ’ असल्याचा दावा केला होता. 27 हिंदू आणि जैन मंदिरे पाडून जमवलेल्या साहित्यातून हे स्मारक उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!