Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पेट्रोल – डिझेल दर कपातीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना निर्मला सीतारामन यांचे उत्तर

Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर देशभरात पेट्रोल ९.५ रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, केंद्राच्या घोषणेनंतर विरोधक हल्लाबोल करताना  आकड्यांचा खेळ करून केंद्र सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचे सांगत काँग्रेसने सरकारवर टीका केली. या टीकेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.


सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर जे उत्पादन शुल्क कमी केले आहे त्यात राज्य सरकारचाही वाटा आहे. अशा स्थितीत केंद्राने असे करून जनतेला कोणताही मोठा दिलासा दिलेला नाही. सरकार यापेक्षा खूप चांगले काम करू शकले असते. या टीकेला  एकापाठोपाठ एक अनेक ट्विट करीत सीतारामन यांनी विरोधकांना उत्तरदिले आहे. इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. त्याचबरोबर एनडीए सरकारने १० वर्षात जेवढे काम केले तेवढे काम यूपीए सरकार आठ वर्षांत करू शकले नाही, असेही ठणकावून सांगितले आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मूलभूत उत्पादन शुल्क (BED), विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (SAED), रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकर (RIC) आणि कृषी आणि पायाभूत सुविधा विकास उपकर (AIDC) मिळून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क बनवतात. मूलभूत ईडी राज्यांसह सामायिक केले जाते. तर SAED, RIC आणि AIDC सामायिक केलेले नाहीत.”

त्यांनी पुढे म्हटले आहे कि , “पेट्रोलवरील ₹8/लीटर आणि डिझेलवरील ₹6/लीटर उत्पादन शुल्कात कपात, जी आजपासून लागू झाली आहे, ती पूर्णपणे रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस (RIC) मध्ये करण्यात आली आहे. इतकेच नाही तर पेट्रोल नोव्हेंबर २०२१ डिझेलमध्ये ₹5/लीटर आणि डिझेलमध्ये ₹10/लीटर ची अंतिम उत्पादन शुल्क कपात देखील पूर्णपणे RIC मध्ये करण्यात आली. मूळ ईडी जी राज्यांसह सामायिक केली गेली आहे त्याला स्पर्श केला गेला नाही. म्हणून, या दोन कर्तव्यांचा संपूर्ण भार केंद्र उचलत आहे.”

काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

त्याच वेळी, रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीचा संदर्भ देत, त्या  म्हणालय  की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा २०१४ ते -२०२२ मध्ये एकूण विकास खर्च ₹ ९०.९ लाख कोटी आहे. त्या तुलनेत २००४ ते – २०१४ या काळात केवळ ४९.२ लाख कोटी रुपये विकासावर खर्च झाले.

अर्थमंत्री पुढे म्हणाल्या कि , “काल आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इंधनावरील शुल्क कपातीमुळे दरवर्षी २,२०,००० कोटींच्या महसुलावर परिणाम होत आहे.” विशेष म्हणजे, इंधनाच्या वाढत्या किमतींपासून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्राने शनिवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ८ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात ६ रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. केंद्राच्या या  घोषणेचा खरपूस समाचार घेत काँग्रेस नेते म्हणाले, “लोकांची फसवणूक करण्यासाठी देशाला आकडेमोड करण्याची गरज नाही.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!