Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : पाणी प्रश्नावरून औरंगाबादेत राजकीय संघर्ष , खा. जलील म्हणाले कि , हि तर नौटंकी…

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून शहरात भाजप – शिवसेना आणि आता एमआयएम च्या नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष सुरु झाला आहे. भाजपने आज औरानागाबाद शहरात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे तर या मोर्चावर शिवसेनेने तीव्र टीका केली आहे. दरम्यान आता  भाजपच्या या मोर्चाला ‘ड्रामाबाजी’ असे संबोधून खा. इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केला आहे.


औरंगाबाद हा तुमचा गड असेल तर आमचाही गड आहे अशी गर्जना करून खा. जलील म्हणाले कि , यांचे हे राजकीय नाटक आहे.  या दोघांच्या वादात सर्वसामान्याना गाडण्याचे  काम केले जात आहे. यांच्या मोर्चाने औरंगाबादकरांना खरोखरच पाणी मिळणार असेल तर मी सुद्धा औरंगाबादकर म्हणून यांच्या मोर्चात जाईल पण हि सगळी नौटंकी आहे.

या मोर्च्यासाठी लाखो रुपये खर्च करून शहरात ठीक-ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे, पण भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना सुद्धा माहित आहे की, याने काहीही होणार नाही. त्यामुळे लोकांच्या घरा-घरात जाऊन त्यांना हंडे दिले जात असून मोर्च्यात सहभागी होण्यासाठी सांगितले जात आहे. मात्र लोकांनाही माहित आहे की, पाणी मिळणार नाही,असा आरोप जलील यांनी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!