Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime Update : मोठी बातमी : औरंगाबादेतील आई -वडिलांचा खून करून पसार झालेल्या संशयितास गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून तातडीने अटक

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील संशयित देवेंद्र कळंत्रीला तडकाफडकीने ताब्यात घेण्यास औरंगाबादच्या गुन्हेशाखेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांचे आणि पथकाने हि यशस्वी कामगिरी करीत शिर्डीतील हाॅटेल साई रेसीडेंन्सीमधे लपून बसलेल्या आरोपीला जेरबंद केले. यासाठी त्यांना शिर्डीच्या स्थानिक पोलिसांचे आणि हाॅटेल व्यवस्थापनाचे सहकार्य मिळाले. गुन्हे शाखेच्या या विशेष पथकात पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अजित दगडखैर, चालक तात्याराव शिनगारे यांचा समावेश होता. 


औरंगाबाद : औरंगाबादेतील खुनाचे सत्र सुरूच असून, आज (दि.२३) सकाळी पुंडलिकनगर जवळील गजानन नगरात पती – पत्नीची गळा चिरून हत्या करण्‍यात आल्‍याची खळबळजनक घटना समोर आली. श्यामसुंदर हिरालाल कळंत्री (वय ६०, रा. गल्ली क्र. 4, गजानननगर) मृत किरण श्यामसुंदर कळंत्री ( ३८, रा. गल्ली क्र. 4, गजानननगर), अशी मृतांची नावे आहेत. पोलीस तपासात त्‍यांचा मुलगा देवेंद्र कळंत्री बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती . रविवारपासून त्याचा फोन लागत नव्हता. ही हत्या शनिवारी घडल्याचा अंदाज आहे. आज परिसरात दुर्गंधी पसरल्यावर हा प्रकार समोर आला.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी देवेंद्र कळंत्री याने आपली सावत्र बहीण वैष्णवी हिला फाेन केला. आई-वडिलांसह मी धुळे येथे जात असल्‍याचे त्‍याने सांगितले. तू आज मुक्‍कामाला काकांकडे जा, असेही देवेंद्रने तिला सांगितले. हा फाेन त्‍याने वडील श्यामसुंदर यांच्‍या माेबाईलवरूनच केला होता. वैष्णवी शनिवारी काकांच्‍या घरी गेली. रविवारी सकाळी ती पुन्‍हा घरी आली. तिने देवेंद्रला फाेन केला. त्‍याचा माेबाईल फाेन बंद हाेता. रविवारी रात्री तिने पुन्‍हा एकदा देवेंद्रला फाेन केला असता, तो बंद असल्‍याचे निदर्शनास आले. सोमवारी सकाळी कळंत्री यांच्‍या घरातून दुर्गंधी येऊ लागली. पुंडलिक नगर पोलिसांना याची माहिती देण्‍यात आली. त्यानंतर हे हत्याकांड समोर आले. घटनास्थळी डीसीपी दीपक गिर्हे, सहायक पोलिस आयुक्त विशाल ढूमे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, दिलीप गांगुर्डे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी भेट दिली.

देवेंद्र हा किरण कळंत्री यांचा सावत्र मुलगा आहे. ताे दहावीनंतर पाच वर्षे शिक्षणानिमित्त बाहेर राहिला. तीनचार वर्षांपूर्वी तो घरी परतला होता. १९ मे रोजी त्याचा वडील श्यामसुंदर यांच्याशी वाद झाला असल्‍याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मुलगा झाला होता गायब

कलंत्री यांची मुलगी औरंगाबादमध्ये घरी येणार होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी तिच्या सावत्र भावाने तिला फोन करून ‘पप्पाच्या मित्राचे निधन झाले असल्याने आम्ही सगळे जण धुळ्याला चाललो आहोत. तू सध्या औरंगाबादला येऊ नको, असे सांगितले होते. काल मुलीने पुन्हा तिच्या वडिलांना फोन लावल्यावर त्यांनी फोन उचलला नाही. त्यावर तिने सावत्र भावाला फोन लावला. यावेळी तिच्या भावाने वडिलांच्या आवाजात तिच्याशी संभाषण साधून तिला औरंगाबादला न येण्यास सांगितले. मात्र, आज थेट तिला आई-वडिलांच्या कुणाचीच माहिती मिळाली, असे सूत्रांनी सांगितले. अर्थात, पोलिस या सगळ्या माहितीची पडताळणी करून पाहत आहेत.

दरम्यान, कलंत्री यांचा  गायब मुलाला ताब्यात घेण्यात औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले असून त्याला औरंगाबादेत आणण्यात आले आहे . त्याच्या जबाबानंतर या दुहेरी खुनावरील रहस्याचा पडदा उलगडू शकणार आहे.

श्यामसुंदर आणि किरण या दोघांचे मृतदेह घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेत पडले होते. यापैकी श्यामसुंदर यांचा मृतदेह गच्चीवर तर किरण यांचा मृतदेह पोत्यात भरून ठेवलेल्या अवस्थेत होता, असे समजते. दोघांच्याही चेहऱ्यावर रोडने मारहाण केल्याच्या आणि नंतर धारदार शस्राने त्यांचा खून करण्यात आल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेआहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!