Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaWorlsdNewsUpdate : राहुल गांधी यांनी सांगितले भाजपच्या विजयाचे आणि काँग्रेसच्या पराभवाचे कारण 

Spread the love

लंडन : आयडियाज फॉर इंडिया परिषदेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले आहेत. या दरम्यान त्यांनी शुक्रवारी एक मुलाखतही दिली, ज्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल करताना काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगितले. त्यांनी सांगितले की काँग्रेस का हरत आहे आणि भाजप प्रत्येक निवडणुकीत का यशस्वी होत आहे?

या निमित्ताने बोलताना  राहुल गांधी म्हणाले की, सध्या भारताची स्थिती चांगली नाही. भाजपने देशभर रॉकेल शिंपडले आहे.  एक ठिणगी लागेल आणि आम्ही मोठ्या संकटात पडू. लोकांना, समाजाला, राज्यांना आणि धर्मांना एकत्र आणणे ही विरोधी पक्षाची, अगदी काँग्रेसचीही जबाबदारी आहे, असे मला वाटते. या आगीला  थंड करणे आवश्यक आहे कारण हि आग थंड केली नाही तर चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. या परिषदेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि तृणमूल काँग्रेसचे महुआ मोईत्रा हे विरोधी पक्षनेतेही सहभागी झाले होते.

राहुल यांनी सांगितले काँग्रेसच्या पराभवाचे कारण

या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींना विचारण्यात आले की, भाजप निवडणूक का जिंकत आहे? काँग्रेस का हरत आहे? तर प्रत्युत्तरात राहुल म्हणाले की, ध्रुवीकरण आणि एकूण मीडिया वर्चस्वाचा भाजपला फायदा झाला आहे. शिवाय आरएसएसने एक रचना तयार केली आहे ज्याचा मोठा परिणाम झाला आहे. विरोधी पक्ष आणि काँग्रेसने अशी चौकट तयार करण्याची गरज आहे. राहुल म्हणाले की, भाजपला मत न देणाऱ्या ६०-७०% लोकांपर्यंत आम्हांला अधिक आक्रमकपणे जाण्याची गरज आहे आणि आम्ही त्यांना एकत्र केले पाहिजे.

देशाची उभारणी करणाऱ्या संस्थांवर होणारे हल्ले लोक पाहत आहेत

ज्या संस्थांनी देशाची उभारणी केली, त्यांच्यावर होणारे हल्ले भारतातील जनता पाहत असल्याचे राहुल म्हणाले. या संस्था आता डीप स्टेटच्या ताब्यात आहेत. सीताराम येचुरी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद, आरजेडी नेते तेजस्वी यादव, महुआ मोइत्रा आणि मनोज झा यांच्यासह अनेक विरोधी नेते राहुल यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले होते.

चीनच्या मुद्द्यावर सरकार बोलू इच्छित नाही

रशिया जे युक्रेनमध्ये करत आहे तसंच चीन लडाखमध्ये करत असल्याचं सांगून राहुल गांधी म्हणाले कि ,  मोदी सरकारला या मुद्द्यावर बोलायचेच  नाही.  चिनी सैन्य लडाख आणि डोकलाम या दोन्ही ठिकाणी तळ ठोकून आहेत. ते म्हणाले की, चिनी सैन्याने नुकताच पॅंगॉन्ग तलावावर मोठा पूल बांधला आहे. ते त्याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करत आहेत. ते स्पष्टपणे काहीतरी तयारी करत आहेत. मात्र सरकारला याबाबत बोलायचे नाही. सरकारला चर्चा दडपायची आहे. हे भारतासाठी वाईट आहे.

भाजप आणि आरएसएसचा फायदा काही लोकांना होत आहे

राहुल गांधी पुढे म्हणाले की, आमचा विश्वास आहे की भारत हा तेथील लोकांमधील संवाद आहे. भाजप आणि आरएसएसचा असा विश्वास आहे की भारत हा भूगोल आहे, तो ‘सोने की चिडिया’ आहे ज्याचा नफा मोजक्या लोकांमध्ये वाटून घ्यावा. तर सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे असे आमचे मत आहे.

जेव्हा मी देशाचा आवाज चिरडलेला पाहतो तेव्हा मला त्रास होतो

राहुल म्हणाले  की, मी स्वत:ला भारताच्या त्या विचाराचे  रक्षण करणारी व्यक्ती म्हणून पाहतो. जेव्हा मी माझ्या देशाचा आवाज चिरडलेला पाहतो तेव्हा मला त्रास होतो. मी काय करावे आणि नाही याचा मी विचार करतो. ही एक आव्हानात्मक परिस्थिती देशात निर्माण झाली आहे परंतु मला वाटते की या मध्ये काम करण्याची  खूप मोठी संधी आहे . दरम्यान भारताच्या परराष्ट्र व्यवहारावरभाष्य करताना ते म्हणाले कि , मी युरोपातील नोकरशहांशी बोलत आहे आणि ते म्हणाले की भारतीय परराष्ट्र सेवा पूर्णपणे बदलली आहे. आता ते काही ऐकणार नाहीत. ते अहंकारी आहेत. आता त्यांना काय ऑर्डर मिळतात ते सांगा. आमच्यात संवाद नाही. तुम्ही ते करू शकत नाही.

जयशंकर यांचे राहुल गांधी यांना प्रत्युत्तर

यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे कि , भारतीय परराष्ट्र सेवा बदलली आहे आणि ते सरकारच्या आदेशाचे पालन करतात.  इतरांच्या युक्तिवादांना आम्ही विरोध करतो  याला अहंकार नाही तर आत्मविश्वास आणि राष्ट्रहिताचे रक्षण म्हणतात.

दरम्यान राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर सोशलमिडियामधून भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. भारत हे एक राष्ट्र नसून राज्यांचा संघ आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी संसदेतही हे वक्तव्य केले होते. यावरून बराच गदारोळ झाला. देशाच्या देशांतर्गत राजकारणाचा संदर्भ देत ते म्हणाले की, भाजपचे काम आवाज दाबणे आहे. केरोसीन देशभर पसरले आहे. आग लावण्यासाठी फक्त एक ठिणगी हवी. राहुलच्या प्रत्येक वक्तव्यावर लोकांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!