Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : धक्कादायक : औरंगाबादेत थरार , विद्यार्थिनीचा भरदिवसा खून , २४ तासात खुनाच्या ३ घटनांनी शहर हादरले…

Spread the love

औरंगाबाद :  औरंगाबाद शहराला हादरवून टाकणारी घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेत एका नराधमाने भर दिवस देवगिरी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कॉलेजमधून पकडून नेट धारदार शस्त्राने गळा चिरून तिचा खून केला. या घटनेनंतर रचनाकार कॉलनी आणि देवगिरी कॉलेजमध्ये एकच खळबळ माजली आहे. दरम्यान औरंगाबाद शहरात गेल्या २४ तासात शहरात तीन खुनाच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 

एकमेकांच्या ओळखीतून हा खून झाल्याची माहिती पोलिसउपायुक्त उज्वला वनकर यांनी दिली. ग्रंथी सुखप्रीत कौर प्रितपालसिंग ( वय 22 वर्षे ) असे मृत हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर शरणसिंग सेठी (२२) रा.उस्मानपुरा असे आरोपीचे नाव असल्याची माहिती मयताच्या भावाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटल्याचे वेदांतनगर पोलिसांनी सांगितले.

दरम्यान खुन्याच्या शोधासाठी वेदांतनगर पोलिस आणि गुन्हेशाखेचे  पथक तैनात करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत असलेल्या ग्रंथीचा आज देवगिरी महाविद्यालयाच्या पाठीमागील भागात मृतदेह आढळून आला . धारदार शस्त्राने तिची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप करंत आहेत.

आज दुपारी घडलेली ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. मिळलेल्या माहितीनुसार, ते दोघेही परिसरात असलेल्या एका कॅफेमध्ये गेले होते. त्यावेळेस त्यांच्यात वाद झाला  आणि त्यानंतर त्या मुलाने ओढत नेऊन तिचा धारदार शस्त्राने खून केला आणि तो पसार झाला .

दरम्यान या घटनेचा एक CCTV व्हिडीओ समोर आला असून  या व्हिडिओमध्ये एक तरुण  एका तरुणीला जबरदस्तीने ओढत घेऊन जाताना दिसून येत आहे. तिच्या पाठीवर सॅक आहे. त्यानंतर काही आजूबाजूचे लोक घटनास्थळी पळत जाताना दिसून येत आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांना तरुणीचा मृतदेह आढळला. यावेळी तरुणीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणाही होत्या.

गेल्या २४ तासात खुनाच्या तीन घटना

औरंगाबाद शहरात गेल्या २४ तासात शहरात तीन खुनाच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी शहरातील नारेगाव भागात एका तरुणीचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका तरुणीचा खून झाल्याने शहर हादरले आहे.

गेल्या २४ तासात पहली घटना शहरातील कटकटी गेट भागात पाहायला मिळाली. शुल्लक कारणावरून दोन तरुणांमध्ये वाद झाला आणि त्यांनतर 19 वर्षाच्या फरहान खान निजाम खान नावाच्या तरुणाने साबिर शहा कासीम शहा ( वय 36, वर्षे रा. नेहरूनगर ) नावाच्या व्यक्तीला धारदार हत्याराने भोसकले. तर त्यांनतर जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर बियरच्या फुटलेल्या बाटलीच्या काचने गळा चिरून हत्या केली आहे. शेख नासिर शेख बशीर वय ( 38 ) असे मृत व्यक्तीचे नाव असून फय्याज राजू पठाण असे आरोपीचे नाव आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!