Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : ‘एटीएस’ ने ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन दहशतवाद्याची विशेष रिमांड होम मध्ये रवानगी

Spread the love

औरंगाबाद – तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद एटीएस ने केलेल्या कारवाईत औरंगाबादेतील एनआयए विशेष प्राधिकृत न्यायालयाने एका अल्पवयीन दहशत वाद्याला विशेष रिमांड होम मधे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

२०१९साली या प्रकरणी एटीएस ने स्वता:फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील ९आरोपी हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या मधे मोह्हम्मद मुशाहिद उल इस्लाम अब्दुल माजिद रा.औरंगाबाद,मोहसीन सिराजुद्दीन खान, मजहर अब्दुल रशिद,भमो.तकी सिराजुद्दीनखान,मो.सरफराज अब्दुल हक उस्मानी, जमान नवाब खुटेउपाड,सलमान सिराजुद्दीनखान, फहाद मोहम्मद इस्तेयाक अन्सारी,व तल्हा हानिफ पोतरिक सर्व रा. मुंब्रा ठाणे यांचा समावेश आहे.

२०१८ मधे वरील आरोपींनी इसीस या दहशतवादी संघटनेशी संलग्न होत उम्मत ए मोहम्मदीया ग्रुप तयार केला होता. ठाणे,मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमात महाप्रसादात विष कालवणे व स्फोट घडवणे असे उद्देश आरोपींचे असल्याचे एटीएस तपासात उघंड झाले होते.

या प्रकरणाची सुनावणी औरंगाबादेत सुरु होती ती एक आठवड्या पूर्वी पूर्ण झाली या कारवाईत तत्कालीन एटीएस पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ,सध्याचे पोलिस अधिक्षक संदीप पालवे यांनी मार्गदर्शन केले. अॅड.मंगेश जाधव यांनी सरकारच्या वतीने कामकाज पाहिले. सध्याचे एटीएस पीआय नितीन कंडारे, सहाय्यक पो.निरीक्षक पुरोषोत्तम देशमुख, कोर्ट अंमलदार मनगटे यांनी कारवाई पार पाडली. त्यावेळी हा तपास पोलिस निरीक्षक  गौतम पातारे, अविनाश आघाव यांनी पूर्ण केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!