Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : कारच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

Spread the love

औरंगाबाद – क्रांतीचौकात काल मध्यरात्री झालेल्या कार आणि रिक्षाच्या धडकेत जखमी रिक्षा चालकाचा उपचारा दरम्यान आज पहाटे ४.१५ला घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी आरोपीला नोटीस देत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मो.रईस मो.युनुस (४२) असे मयत रिक्षा चालकाचे नाव आहे.तर यश शैलेश कपूर रा.सिडको टाऊनसेंटर असे आरोपी कार चालकाचे नाव आहे.तो विद्यार्थी असून इंजनिअरिंगचे शिक्षण घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काल रात्री १२वाजेच्या सुमारास कार चालक यश कपूर याने भरधाव वेगात कार चालवत रिक्षाचालकाच्या मृत्यूला कारणीभूत झाला.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रविण वाघ करंत आहेत

Click to listen highlighted text!