Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaNewsUpdate : जालना – जळगाव रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेला गती, विमानाद्वारे होणार सर्वे

Spread the love

जालना : रेल्वे मंत्रालयाच्या वतीने जालना जळगाव रेल्वे मार्गाचा “फायनल लोकेशन सर्वे” केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी 8 फेब्रुवारी 2022 रोजी मंजूर केला होता. जालना ते जळगाव जिल्ह्यातील लोकांच्या सोयीसाठी जालना- जळगाव 174 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग केला जाणार आहे. त्याच्या सर्वेचे काम (भौतिकदृष्ट्या) फिजीकली सुरुच आहे त्यासोबतच आता हवाई सर्वेसाठी अकोला येथे आज विमान दाखल झाले असून  या विमानाद्वारे रडार (लिडार) चा वापर करुन हवाई सर्वे केला जाणार आहे. तसेच हे विमान एका दिवसाला 50 किलोमीटर चा सर्वे करणार आहे. यामुळे फायनल लोकेशन सर्वेला गती मिळेल. रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे दिलेल्या माहितीनुसार  14 ते 17 मे अशा चार दिवसांत हे हवाई सर्वेक्षण होणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपये सर्व्हेसाठी मंजुर करुन घेतले आहेत. फायनल लोकेशन सर्वे झाल्यानंतर हा स्वीकृतीसाठी रेल्वे बोर्डाकडे जाईल. जालना जळगाव रेल्वेमुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, लघुउद्योग, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

जालना ते पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापुर, जळगाव असा 70% मार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून जात आहे. याचा फायदा पुढे सूरत, गुजरात, राजस्थान च्या गाड्यांना आंध्राप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे. लवकरात लवकर याचे काम पूर्ण  होणार आहे.

अजिंठा हे ऐतिहासिक शिल्पकलेचे पर्यटन स्थळ, या रेल्वे मार्गामुळे येथे जगभरातील पर्यटकांसाठी रेल्वे प्रवासाची सोय होणार आहे. दरम्यान मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूर महागणपती येथून हा रेल्वे मार्ग जात असल्याने या भागातील भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे. अनेक वर्षापासून या भागातील जनतेची ही आग्रही मागणी लक्षात घेता हा निर्णय घेतल्याने उशिरा स्वातंत्र्य मिळवलेल्या मराठवाड्याच्या या ग्रामीण भागाचा शाश्वत विकास हा रेल्वे मार्ग झाल्याने होणार असल्याचे दानवे यांनी मागे सर्वेला मान्यता देतांना म्हटले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!