Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaFilmNewsUpdate : राजकीय नेत्यांमध्येच नाही तर अभिनेत्यांमध्येही पेटले वाद …सुनील शेट्टी यांनी काढला बाप …!!

Spread the love

नवी दिल्ली : सुनील शेट्टी हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. अलीकडेच त्याला साऊथ विरुद्ध बॉलिवूड असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर देताना अभिनेते म्हणाले की, बाप नेहमीच बाप असतो. खरं तर, अलीकडेच, आगामी चित्रपट “मेजर” च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान, साऊथ सुपरस्टार महेश बाबूला त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर त्याने म्हटले की,  “बॉलीवूडला  मी परवडणार नाही…” हा मुद्दा आता तापत आहे. यावर सर्वच सेलिब्रिटी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.


वास्तविक महेश बाबूने आपल्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल सांगितले होते की, “मला माझा वेळ वाया घालवायचा नाही, बॉलिवूडला माझी फीस परवडणार नाही. यापूर्वी दाक्षिणात्य फिल्मीस्टार  सुदीप आणि अजय देवगण यांच्यातही  सोशल मीडियाच्या माध्यमातून वाद झाले आहेत. इतकंच नाही तर राम गोपाल वर्मा, सोनू सूद आणि सोनू निगमसह अनेक सेलिब्रिटींनी या वादावर आपलं मत मांडलं आहे. अलीकडे, काही साऊथचे चित्रपट देशात आणि जगात हिट झाल्यानंतर, दाक्षिणात्य कलाकारांनी बॉलिवूडबद्दल वक्तृत्व करणे सुरू केले आहे आणि स्वत: ला वेगळे सांगण्यास  सुरुवात केली आहे.

या वादाबद्दल बोलताना  सुनील एका मुलाखतीदरम्यान  म्हणाला कि , “तुम्ही काहीही बोला पण बाप बाप होता है …” “मला वाटतं, सोशल मीडियावर बॉलीवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्रीचा वाद सुरु केला आहे. आपण भारतीय आहोत आणि जर आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहिलं तर भाषेला काही फरक पडत नाही, सामग्री महत्त्वाची आहे. मी देखील दक्षिणेतून आलो आहे, पण माझी कर्मभूमी मुंबई आहे. मला मुंबईकर म्हणणे पसंत आहे.

कोणता चित्रपट पाहावा आणि कोणता पाहू नये हा निर्णय प्रेक्षक घेत आहेत. आमची अडचण अशी आहे की , आम्ही प्रेक्षकांना विसरलो आहोत. सिनेमा असो वा ओटीटी, बाप हा बापच राहणार, कुटुंबातील बाकीचे सदस्य कुटुंबातीलच राहणार. बॉलीवूड नेहमीच बॉलीवूड राहील. आपण विचार केला पाहिजे, कारण आजच्या काळात आशय हाच राजा आहे हे खरे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!