Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mundka Fire Update : राजधानीतील भीषण आगीत २६ जणांचा होरपळून मृत्यू , आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न… 

Spread the love

नवी दिल्ली : दिल्लीतील मुंडका येथील एका व्यावसायिक इमारतीला लागलेल्या भीषण आगीत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम दिल्लीतील मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात आग लागली, मात्र काही वेळातच संपूर्ण इमारतीला आग लागली.


तीन मजली इमारतीतून अनेक फूट उंच ज्वाळा दिसत होत्या आणि भयंकर धुराच्या लोटात अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. अग्निशमन दलाच्या सुमारे दोन डझन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान हायड्रॉलिक क्रेनच्या साह्याने आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढत असताना एका महिलेचा मृत्यू झाला.रात्रीपर्यंत आग पूर्णपणे विझवता आली नाही आणि त्यातून धूर निघत होता.

आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न…

पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला आग लागली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ४.४५ च्या सुमारास ही माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मेट्रो स्टेशनच्या ५४४ क्रमांकाच्या खांबाजवळ असलेल्या इमारतीला आग लागली असून ती विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान लोकांना वाचवण्यासाठी पोलिसांनी इमारतीच्या खिडक्या तोडून जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत या उद्ध्वस्त इमारतीतून 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शोधकार्य सुरू आहे.

अनेक लोक अडकल्याची भीती

याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंडका मेट्रो स्टेशनच्या ५४४ क्रमांकाच्या पिलरजवळ असलेल्या इमारतीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडून इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि जखमींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दिल्लीचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) समीर शर्मा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार, हि आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून सुरू झाली जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय आहे. आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या इमारतीत अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!