Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Prasangik : स्मरण : Blog । औरंगाबादेतील महिला अखंड हरिनाम सप्ताहाचे जनक : बाबुराव वाघ गुरूजी

Spread the love

माझे आजोबा दिवंगत बाबुराव भाऊराव वाघ(गुरूजी). आमचे आण्णा आजच्या दिवशी आमच्यातून निघून गेले, पण मनाने आज पण ते आमच्या जवळ आहेत. आज  त्यांचा ५ वा  स्मृतिदिन. ते निघून गेले हे मानायला मन तयारच होत नाही. त्यांची नात म्हणून जन्म घेतला ह्या गोष्टीचा कायमच अभिमान आहे.

एका सामान्य कुंटूबातील व्यक्ती आपल्या चांगल्या कार्यातून किती लोकांना आपलस करू शकते. ह्याच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे आजोबा. सगळ्यांचे आदरणीय गुरूजी, खरतरं त्यांची विचारसरणीला तोड नव्हती. सखोल वाचनामुळे आजूबाजूला असलेल्या जगाची जवळून माहिती त्यांच्या कडे होती. प्रसारमाध्यम म्हणजे बातम्या आणि वृत्तपत्र वाचन ह्या मुळे एक ज्ञानी वाचक म्हणून मी त्यांच्या कडे बघायचे. त्यांची ओळख इथेच काही थांबत नाही. त्या ज्ञानाचा वापर त्यातून केलेली भजनी मंडळाची सुरूवात. वार्षिक सगळ्या जाती-धर्मातील संताच्या जयंत्या आणि पुण्यतिथी साजरा करून एक नवा आदर्श दिला. महिलांना एक हक्काच व्यासपीठ भेटाव म्हणून महिलांसाठी आजतागायत सुरू असलेला महिला अखंड हरिनाम सप्ताह.

मराठवाडा वारकरी मंडळाचे सचिव

मला विशेष कौतुक ह्या गोष्टीच वाटत की, कुणाला जर त्यांनी काम सांगितल तर सांगितल्या क्षणी आण्णांच काम करण्याची उत्सुकता सगळ्यांना असायची. ह्या वरून आण्णावर असलेला विश्वास आणि त्यांच्या प्रती असलेला आदर हा वाखण्याजोगा होता. मराठवाडा वारकरी मंडळाचे सचिव असताना आण्णा त्यांच्या वर असणारी जबाबदारी मासिक मींटींग, महिनाभरातील कामाचा आढावा ते घ्यायचे. त्या वरून त्यांच्यावर असणारी जबाबदारी ते निष्ठेने पार पाडायचे.

वारकरी संप्रदायातील योगदान

मला आजही आठवत की, श्रीरामनगर मध्ये विठ्ठल-रूख्मिनी मंदिराचा जीर्णोद्धार करताना रोज मंदिरात जावून ते कामाची माहिती घ्यायचे. आजही ते मंदिर बघितल की आण्णा ची आठवण आल्या शिवाय राहत नाही. त्यांची भक्ती ही दांभिक भक्ती नव्हती. कुणालाही दोन घास खाऊ घालण्यात माणसाला पुण्य लाभत अस ते आम्हाला सांगायचे.
आण्णांच्या शिकवणीतून अनेक जणांनी प्रेरणा घेतली. त्यांनी सगळ्यांना आपलस केल. ते आयुष्यभर निस्वार्थी जगले. परिस स्पर्श व्हावा तसा सगळयांचा कुटुंबातील सदस्या प्रमाणे सांभाळ केला. त्यांनी नोकरी सांभाळून समाज कार्यात हातभार लावला. संकटकाळात जो विश्वास आणि पाठिंबा लागतो तो आण्णासाहेबांकडून भेटायचा.प्रत्येक जण त्यांच्या कडे मार्गदर्शन घ्यायला यायच आणि त्यांच मार्गदर्शन भेटल की मन हलक वाटायच.त्यांच वारकरी संप्रदायातील योगदान खूप मोठ आहे. त्यांच्या सान्निध्यात राहिल्याने मला ही गोष्ट मी खूप जवळून अनुभवली की ते परक कधी कुणाला मानत नव्हते. त्यांच्या कडे दूरदृष्टी होती. ते कधीच हरले नाहीत त्यांच्या कडे लढण्याची ताकद होती ती ताकद म्हणजे त्यांना साक्षात भगवान पांडुरंगाचा आशीर्वाद होता.

माझे आण्णा एक महायाेध्दे होते.ते एक अजातशत्रू होते. माझ्या कडून माझ्या आजोबांना विनम्र अभिवादन.आण्णांच्या पंचम पुण्यतिथीनिमित्त आण्णांना भावपूर्ण आदरांजली…

मनिषा बोधने-जाधव
Email_id: manishabodhane17@gmail.com

आपलं सरकार

Click to listen highlighted text!