Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMedia : अजब गजब : टीव्ही पाहत होता कुत्रा…पुढे काय झाले तुम्हीच पाहा…

Spread the love

सोशल मीडियावर प्राण्यांचे विचित्र व्हिडिओ पाहून कधी हसायला येतं, तर कधी मन आश्चर्यानं भरून येतं. कधी कधी हे व्हिडीओ घाबरवतात, मग ते हृदयाला भिडतात. एका कुत्र्याचा असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला या कुत्र्याची कीव येईल. व्हिडिओमध्ये एक कुत्रा सोफ्यावर आरामात बसून टीव्ही पाहत असल्याचे दिसत आहे, परंतु तेव्हाच त्याला टीव्हीवर काहीतरी दिसते, ज्यामुळे ज्यामुळे त्याची भीतीने गाळण उडते .  यादरम्यान, हा कुत्रा अचानक उठतो आणि सोफाच्या मागे लपतो, त्याची घाबरलेली अवस्था पाहून तुम्हालाही हसू येईल.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तपकिरी रंगाचा कुत्रा सोफ्यावर बसून मौजमजा करत असल्याचे दिसत आहे. तो मोठ्या आनंदाने टीव्ही पाहत आहे, इतक्यात अचानक टीव्हीवर एक भितीदायक पात्र दिसते. काळा कोट असलेला हा खलनायक टीव्हीच्या छोट्या पडद्यावर येते आणि हे दृश्य पाहून त्याचीही चलबिचल होते. टीव्हीवर दिसणार्‍या या भितीदायक पात्राला घाबरून कुत्राही शेपूट दाबून सोफ्याच्या मागे लपतो. सोफ्याच्या मागे उभा राहून तो भीतीने पाहतो. वास्तविक, या पात्राचे नाव डार्थ वाडर आहे, स्टार वॉर्समधील हे एक काल्पनिक पात्र आहे.

सोशल मीडिया युजर्सनाही हा व्हिडिओ पाहून खूप मजा येत आहे. एका यूजरने डॉगीसाठी लिहिले, ‘अरे??? हे काय आहे? देवा मला वाचव.’ त्याचबरोबर काही युजर्सना कुत्र्याची  दयाही येत आहे. एका यूजरने लिहिले, ‘अरे काय गोड कुत्रा आहे.’ ट्विटरवर या व्हिडिओला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Click to listen highlighted text!