Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : धक्कादायक : देशातील ४५ टक्के म्हणजे ३६ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने….

Spread the love

नवी दिल्ली : जागतिक महासत्ता होण्याच्या गप्पा मरनारांच्या आपल्या देशात  2020 मध्ये देशातील एकूण 45 टक्के मृत्यू लोकांना वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने झाले आहेत. आपल्या देशासाठी अत्यंत लाजीरवाणी ठरलेली ही आकडेवारी भारतीय रजिस्ट्रार जनरल (RGI) यांनी यांनी आपल्या अहवालात दिली आहे. त्यांनी गोळा केलेल्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये भारतात एकूण 82 लाख लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी 45 टक्के लोकांना त्यांच्या मृत्यूच्या वेळी कोणतीही वैद्यकीय सुविधा मिळाली नाही आणि या काळात मृत्यू झालेल्यांपैकी केवळ 1.3 टक्के  वैद्यकीय सुविधा मिळाल्या परंतु ते वाचू शकले नाही. तथापि, 2020 सालासाठीच्या आरजीआयच्या या अहवालाच्या  ‘Vital Statistics of India based on Citizen Registration System’ मध्ये कोविड-19 मधील मृतांच्या संख्येचा उल्लेख नाही असे म्हटले आहे.


ग्रामीण भागात बालमृत्यू दर केवळ 23.4 टक्के होता, तर शहरी भागात 76.6 टक्के

दरम्यान आरजीआयच्या अहवालानुसार, 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून मृतांना पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांबाबत संपूर्ण माहिती मिळाली आहे. अहवालात म्हटले आहे की महाराष्ट्र आणि सिक्कीम या दोन राज्यांकडून आंशिक माहिती प्राप्त झाली आहे, त्यामुळे या दोन राज्यांचा डेटा संकलनात समावेश करण्यात आलेला नाही. बालमृत्यूच्या संदर्भात, अहवालात म्हटले आहे की 2020 मध्ये, ग्रामीण भागात बालमृत्यू दर केवळ 23.4 टक्के होता, तर शहरी भागात 76.6 टक्के होता.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये, जेव्हा देशात पहिल्यांदा कोविडची प्रकरणे समोर आली, तेव्हा महामारीमुळे 1.48 लाख लोकांचा मृत्यू झाला, जो 2021 च्या तुलनेत खूपच कमी आहे. 2021 मध्ये देशात महामारीमुळे 3.32 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. RGI अहवालानुसार, “2020 मध्ये नोंदवलेल्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे 1.3 टक्के मृत्यूंमध्ये अॅलोपॅथी किंवा इतर वैद्यकीय क्षेत्रातील पात्र व्यावसायिकांकडून वैद्यकीय सुविधा होत्या.” मृत्यू झालेल्यांपैकी ४५ टक्के लोकांना त्यांच्या मृत्यूच्या वेळी कोणतीही वैद्यकीय सुविधा मिळाली नव्हती.

दरम्यान 2019 मध्ये वैद्यकीय सुविधांअभावी मृत्यू झालेल्यांची संख्या 35.5 टक्के होती. आकडेवारीनुसार, एकूण मृत्यूंपैकी 28 टक्के मृत्यू रुग्णालये इत्यादींमध्ये झाले आहेत आणि इतरत्र उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. आकडेवारीनुसार, एकूण नोंदणीकृत मृत्यूंपैकी 16.4 टक्के मृत्यू रुग्णालयाबाहेर उपचार घेत असलेल्या रुग्णांचे आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!