Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : वाढती महागाई आणि गॅसच्या किमतीवरून लोकांना आठवला मोदींचा हा महत्वपूर्ण सल्ला !!

Spread the love

नवी दिल्ली : देशातील वाढत्या महागाईने होरपळत चाललेल्या नेटकऱ्यांना पेट्रोल – डिझेलच्या वाढीबरोबरच परवा घरगुती एलपीजी गॅसच्या दारात ५० रुपयाची वाढ होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या व्हिडिओची आठवण झाली आहे.  मोदींचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा हा व्हिडिओ असून यामध्ये या व्हिडीओमध्ये मोदी नागरिकांना गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किंमतीवरून महत्वाचा सल्ला दिला आहे. 

देशात तत्कालीन काँग्रेस सरकारने गॅस सिलेंडरचे भाव वाढल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी  काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. ‘तुम्ही जेव्हा मतदान करायला जाल, तेव्हा घरातील गॅस सिलिंडरला नमस्कार करा,’ असे  नरेंद्र मोदी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.

दरम्यान देशात मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आणि भाजपचे सरकार आल्यानंतर ही  पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. तसेच खाद्यतेल आणि डाळींचे भावही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आणि अशात व्यावसायिक तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे . त्यामुळे महागाई नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारवर विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

विशेष म्हणजे २०१४ च्या आधी जेंव्हा भाजप सत्तेत नव्हता तेंव्हा विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपने महागाईच्या मुद्द्यावरून तत्कालीन मनमोहनसिंग सरकारला चांगळेच धारेवर धरले होते.  दरम्यान एका सभेत बोलत  असताना नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतही हा मुद्दा उपस्थित करत मतदारांना मतदान करायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जाण्याचा सल्ला दिला होता. तर स्मृती इराणी अन्य महिला नेत्यांनी मनमोहन सरकारला  बांगड्याचा आहेर पाठवण्याची भाषा वापरली होती.

एका नेटकऱ्याने आपल्या ट्विटरवर मोदींचा हा व्हिडीओ शेअर करीत आता २०२४ मध्ये जनता गॅस सिलेंडरलाच नव्हे तर आपली मोटारसायकल, टॅक्सी , किराणा दुकान, कर्ज देणाऱ्या बँका  , अर्धा पगार करणारी कार्यालये या सर्वांना नमस्कार करून मतदानाला जातील असे म्हणत मोदी सरकारवर टीका केली आहे. 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!