Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

KolhapurNewsUpdate : मोठी बातमी : विधवा महिलांच्या संदर्भात “या” ग्राम पंचायतीने घेतला क्रांतिकारक निर्णय !!

Spread the love

Photo Credit : Google Image  : Water film : Symbolic 

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्याला साजेसा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे गावातील विधवा महिलांचे समाजातील कुप्रथांनी हिरावून घेतलेले मानवी अधिकार बहाल केले आहेत. राज्याचे माहिती उपसंचालक (वृत्त ) दयानंद कांबळे यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून हि माहिती दिली आहे.


या माहितीमध्ये त्यांनी हेरवाड ग्राम पंचायतीने घेतलेल्या ठरावाची ऐतिहासिक प्रत जोडली आहे. दि . ४ मे २०२२ रोजी घेतलेल्या या ठरावात म्हटले आहे कि, “आपल्या समाजात पतीच्या निधनाच्या वेळी , अंत्यविधीच्या प्रसंगी पतीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोंडाने, हातातील बांगड्या फोडणे. पायातील जोडवी.काढणे असे प्रकार करण्याची प्रथा आहे . तसेच तिला “विधवा” म्हणून कोणत्याही प्रकारच्या भार्मिक, सामाजिक कार्यक्रमात. सहभागी होता येत नाही. मात्र कायदयाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. मात्र या प्रथांमुळे कायद्याचा भंग होत आहे. तरी आपल्या गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांनाही सन्मानाने जगता आले पाहिजे. या करीता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. या संदर्भात भावामध्ये जनजागृती करण्यात यावी. त्यास ही सभा मंजुरी देत आहे.” या ठरावावर सूचक म्हणून मुक्ताबाई रूज पुजारी तर अनुमोदक म्हणून सुजाता केशव गुरव यांची नावे आहेत.

राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णयाचे सर्वत्र स्वागत होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षातही कायद्याने स्त्रियांना जगण्याचा समान हक्क दिलेला असताना आजही समाजात महिलांना दुय्यम स्थान दिले जाते हि वस्तुस्थिती आहे. समाजातील विधवा महिलांची स्थिती तर मोठी दयनीय आहे. तिच्याकडे बघताना भेदाच्या भावनेने बघितले जाते . सुवासिनी महिलांच्या तुलनेने त्यांचा कायम अवमान केला जातो. वर्तमान समाज सुधारणेचा कितीही आव अनंत असला तरी महिलांच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात विधवा महिलांना सन्मान दिला जात नाही . पांढऱ्या कपाळाची म्हणून तिला हिनवले जाते . या सर्व प्रथांना कुठे तरी मूठमाती देण्याचे अलौकिक कार्य या ग्राम पंचायतीने केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!