Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : संचारबंदीमुळे खरगोन मध्ये ईद बरोबर , अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती घरातच … !!

Spread the love

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये 2 आणि 3 मे रोजी संचारबंदी लागू करण्यात आल्याने ईदची नमाज तसेच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंतीला जिल्ह्यात कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी दिली जाणार नाही. हे सर्व घरातच साजरे करा असे आवाहन खरगोनचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी सुमेर सिंह मुजल्डा यांनी केले आहे.

10 एप्रिल रोजी रामनवमी मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीनंतर शहरात अचानक हिंसाचार उसळला होता. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी पुढे म्हणाले की, १ मे रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत शिथिलता दिली जाईल. एडीएम म्हणाले, “दुकाने खुली राहतील आणि परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना पास दिले जातील, असा आदेश काढण्यात आला आहे. मात्र मागणीनुसार निर्णय बदलता येईल.”

10 एप्रिल रोजी मिरवणुकीत लोकांच्या गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने झालेल्या हिंसाचारात पोलिस कर्मचार्‍यांसह अनेक लोक जखमी झाले होते. मिरवणुकीच्या सुरुवातीलाच दगडफेक सुरू झाली, त्यात एका पोलिस निरीक्षकासह चार जण जखमी झाले. यानंतर हे प्रकरण देशभरात चर्चेत आल्यानंतर राजकीय पक्षांसाठी हा राजकीय मुद्दा बनला.

काय आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सार्वजनिक स्वरूपातील ईद , अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंतीला परवानगी देण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासन आणि समाजातील नेत्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे 10 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर तेथे संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात संचारबंदी वेळोवेळी शिथिल करण्यात येत होती परंतु शहरातील तणाव अद्याप पूर्णतः निवळलेला नसल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!