Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeNewsUpdate : धक्कादायक : जालन्याला जाणाऱ्या ८९ तलवारी आणि एक खंजीर जप्त

Spread the love

धुळे : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तलवारींची आलेली पार्सले पोलिसांकडून जप्त करण्यात येत आहेत. औरंगाबाद शहरातही कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून तलवारी मोठ्या प्रमाणात आल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान आता  राजस्थानातील चितोडगड येथून जालना येथे शस्त्रास्त्रे नेणाऱ्या चौघांना मुंबई आग्रा महामार्गावर गस्तीवर असलेल्या सोनगीर पोलिसांनी बुधवारी सकाळी ७ वाजता पाठलाग करून पकडले. त्यांच्या वाहनातून तब्बल ८९ तलवारी आणि एक खंजीर जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जालना येथील चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी सापडल्याने महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट तर सुरू नाही ना असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

https://twitter.com/ANI/status/1519529780596461568

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनगीर पोलिसांना वाघाडी फाट्याजवळ शिरपूरकडून धुळ्याकडे येणारी संशयास्पद कार नजरेस पडली. पोलिसांनी कारसह सुमारे ७ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मोहम्मद शरीफ, मोहम्मद शफिक, शेख इलियास शेख लतिफ, सय्यद रहिम आणि कपिल विष्णू दाभाडे या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात भादंवि कलम १८४, २३९, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलवार प्रकरणावर भाजपची प्रतिक्रिया

दरम्यान या प्रकाणावर भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात धुळ्यात ८९ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. ज्या राजस्थानात काँग्रेसचं सरकार आहे त्याठिकाणाहून धुळ्यात या तलवारी आल्या आहेत. जालनाला या तलवारी पाठवण्यात येणार होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी कशाला? कुणाला दंगल घडवायची आहे? महाराष्ट्रात तलवारी पाठवणारे राजस्थानमधील कोण लोक आहेत? या प्रकरणाच्या खोलवर तपास केला पाहिजे. ठाकरे सरकार ही चौकशी करणार का? असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी केला आहे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!