Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : बातमी मागची बातमी : राज ठाकरे यांची औरंगाबादची सभा आणि राजकीय पटलावरच्या हालचाली …. !!

Spread the love

मुंबई : मुंबईतील इस्लाम जिमखान्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित रोजा इफ्तार पार्टीच्या निमित्ताने बोलताना शरद पवार यांनी  ” कुणाला सभा घ्यायची तर सरकार परवानगी देणार आहे. पण लोकांना बोलवणे आणि आपसात भाईचार संपेल अशी वक्तव्य करणे ठीक नाही, असे म्हटल्याने त्यांनी अप्रत्यक्षरीत्या राज ठाकरे यांच्या १ तारखेच्या चर्चेत असलेल्या सभेला “ना हरकत ” प्रमाणपत्र दिले आहे .

दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही “राज ठाकरेंच्या सभेबाबत निर्णय औरंगाबदचे पोलीस आयुक्त घेतील आणि माझ्या माहितीप्रमाणे ते परवानगी देतील,”   असे म्हटल्याने राज ठाकरे यांच्या १ मे च्या जाहीर सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद शहरात होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला विविध संघटनांनी विरोध केला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांची या सभेमागची भूमिका मात्र अद्याप उघड झालेली नसल्याने त्यांच्या अखेरच्या भूमिकेवरही या सभेचे भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. 

दुसरीकडे औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनीही राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आपल्या अधिकाऱ्यांना सभेच्या ठिकाणचीव पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांच्या कोल्हापूर येथील सभेला परवानगी मिळाली त्याप्रमाणे आम्हालाही सभेला परवानगी मिळेल असे सांगितल्याने राज ठाकरे यांची सभा निश्चित होणार असे संकेत मिळत आहे.

मुळात मनसे नेते राज ठाकरे यांची सभा म्हणजे अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्यामुळे अर्थातच सरकारच्या हिरव्या झेंड्याशिवाय राज यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळणे तसेही दुरापास्त होते परंतु आता थेट शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी आपला हिरवा कंदील दाखवताच औरंगाबाद जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन हि सभा शांततेत पार पदवी म्हणून सक्रिय झाले आहे.

पोलीस आयुक्तांची भूमिका

या विषयावर बोलताना पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले कि , “एक मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या सभेचे औरंगाबाद जिल्ह्यात आयोजन करण्यात आले असून या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून परवानगी मागितली आली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्यावतीने सदरील मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाच्या वतीने बैठक घेऊन राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी द्यायची किंवा नाही या संदर्भात निर्णय घेतला जाईल,” असं निखील गुप्ता म्हणालेत.

दरम्यान आज आज बुधवारी औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांची भेट घेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले कि , शरद पवारांच्या सभेला ज्याप्रमाणे कोल्हापूरला परवानगी देण्यात आली त्याप्रमाणे राज ठाकरेंच्या सभेलाही परवानगी मिळेल. पोलिसांकडून ज्या काही सूचना असतील त्याचं पालन करण्याची जबाबदारी आमची असून आम्ही त्याचे  पालन करु असे मी पोलिसांनासांगितले आहे.

औरंगाबाद पोलीस आयुक्त राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देतील

“राज्यातील शांतता बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करु नका. नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे सगळ्यांना आपल्या पुढे जाता येईल. पण राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर सरकार हे सहन करणार नाही. राज ठाकरेंच्या सभेबाबत निर्णय औरंगाबदचे पोलीस आयुक्त घेतील आणि माझ्या माहितीप्रमाणे ते परवानगी देतील,” असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांच्या सभेला विरोध

विशेष म्हणजे औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलसह वंचित बहुजन आघाडीसह जवळपास ६ पक्ष संघटनांनी राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला विरोध केलेला आहे. दरम्यानच्या काळात वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद शहरात आयोजित केलेली हिजाब गर्ल मुस्कानच्या सभेला पोलिसांनी दोन समाजात तेढ नको म्हणूनच कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करीत परवानगी नाकारली होती त्याच कारणावरून राज ठाकरे यांच्या सभेलाही परवानगी नाकारण्यात यावी असे या पक्ष संघटनांचे म्हणणे आहे. सभेला परवानगी मिळाली नाही तर प्रसंगी हायकोर्टात जाण्याचा इशाराही मनसेच्या नेत्यांनी दिला होता.

मुंबईच्या इफ्तार पार्टीत काय बोलले शरद पवार ?

मुंबईतील इस्लाम जिमखान्यात रोजा इफ्तार पार्टी पार पडली. यावेळी बोलत असताना शरद पवारांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. या इफ्तार पार्टीत बोलताना शरद पवार म्हणाले कि , ‘लोकांमध्ये, समाजात भांडणे लावणे हे योग्य नाही. पोलिसांच्या विरोधात आरोप केले जातात. वातावरण बिघडवन्याचा प्रयत्न सुरू आहे. मागच्या आणि आजच्या परिस्थितीत फरक आहे. आज देशात खासकरून राज्यात आणि दिल्लीत एक प्रकारचा माहोल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी काम काही राजकीय नेते करत आहे.  कोणाला सभा घ्यायची तर सरकार परवानगी देणार, पण लोकांना बोलवणे आणि आपसात भाईचार संपेल अशी वक्तव्य करणे ठीक नाही’

राज्यात दिल्लीसारखी परिस्थिती तयार करण्याचा प्रयत्न

दिल्लीत जे झालं ते चांगलं झालं नाही. दिल्लीत हल्ले झाले, घरे देखील पाडण्यात आली. अशीच परिस्थिती आपल्या राज्यांत तयार करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, अशी टीकाही पवारांनी केली. देशाच्या राजधानीत दिल्लीत एक प्रकारचे वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे असले तरी कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे. दिल्लीत हल्ले झाले. देशातील वातावरण बिघडवण्याचे काम झाले आहे. आपापसातील बंधुभाव कमी करण्याचे वक्तव्य करणे योग्य नाही. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यातील जनता ज्याप्रकारे सर्वधर्मसमभाव मानते त्यामध्ये हिंदू असो की मुसलमान, ख्रिश्चन असो या सर्वांनी आपापसातील बंधुभाव टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवे,”. “कोणाला सभा घ्यायची तर सरकार परवानगी देणार आहे. पण लोकांना बोलावणे आणि आपापसातील संबंध संपेल अशी वक्तव्य करणे ठीक नाही. असे काम काही राजकीय नेते करत आहे,” असे म्हणत शरद पवार यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!