Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MatoshreeLatestNewsUpdate : मातोश्रीवर शिवसैनिक आणि पोलिसांचा कडा पहारा , वर्षा आणि सिल्व्हर ओक बंगल्यावरही मोठा बंदोबस्त

Spread the love

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्यामुळे मातोश्रीसमोर पोलिसांबरोबर शिवसैनिकांचीही मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान मातोश्रीच्या समोरील रस्त्यावर कलानगरच्या सिग्नलवर भाजपच्या मोहित कंबोज यांची गाडी दिसताच या गाडीला घेरण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्न केला परंतु प्रसंगावधान राखून कंबोज यांच्या वाहनचालकाने घटनास्थळावरून तत्काळ गाडी पाठविल्याने अनर्थ टळला. दरम्यान मातोश्री समोर जमा झालेल्या शिवसैनिकांना हात जोडून आपापल्या घरी जा मातोश्रीसमोर काहीही घडणार नाही असे सांगून समजवण्याचा प्रयत्न केला तरीही शिवसैनिक मातोश्री सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे  या सर्व प्रकरणामुळे मातोश्री आणि कलानगर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 

हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार पोलिसांनी राणा दाम्पत्याला मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही असे कोणतेही कृत्य न करण्याची नोटीस बजावलेली असली तरीही राणा दाम्पत्याने अमरावती सोडली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान मातोश्रीवरील पोलीस बंदोबस्त आणि शिवसैनिकांची गर्दी पाहता राणा दांपत्य इतरत्र आंदोलन करु शकते अशी शक्यता गृहीत धरून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्याबरोबर राष्ट्रावादीचे नेते शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाबाहेरही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

राणा दांपत्याला दिली पोलिसांनी नोटीस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण गरम केल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी  ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे जाहीर केले आहे . परंतु मातोश्री बंगला हा मुख्यमंत्र्यांचं खाजगी निवासस्थान आहे. परिसरात अनेक शासकीय कार्यलये आणि इतर अतिमहत्त्वाची आस्थापने आहेत. तसेच याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. तसेच धरणे, आंदोलने, रॅली, संप, निदर्शने असे कार्यक्रम फक्त आझाद मैदानात करण्याचा आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात अंदोलन अथवा निषेध करू नये. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस खेरवाडी पोलिसांकडून राणा दाम्पत्याला बजावण्यात आली आहे. तरीही नोटिसीला न जुमानता राणा दांपत्य आज मुंबईत दाखल झाले असल्याचे वृत्त आहे. मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरी जाऊन नोटीस बजावली आहे. राणा दाम्पत्य हे सध्या मुंबईतील खार येथील आपल्या घरी आहेत.

मुख्यमंत्र्यांची शिवसैनिकांना विनंती

विशेष म्हणजे शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांसोबत पक्षाचे अनेक मोठे नेतेही उपस्थित आहेत. दरम्यान  राणा दांपत्याविरोधात घोषणाबाजी केली जात सटाणा  दुपारी ४.३० च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी मातोश्रीबाहेर आली. शिवसैनिकांची गर्दी पाहून उद्धव ठाकरे तिथेच गाडीतून खाली उतरले आणि हात जोडत शिवसैनिकांचे आभार मानले. यानंतर ते चालत मातोश्रीच्या दिशेने गेले.  त्यानंतरही शिवसैनिक मातोश्रीबाहेर ठाण मांडून बसले आहेत. “तुम्ही कृपा करुन सगळ्याजणांनी घरी जा. इकडे कोणी हिंमत करणार नाही. तुम्ही दिवसभर इथे आहात त्यामुळे घरी जा,” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेरील शिवसैनिकांना केले आहे. तरीही शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली आहे.

बच्चू कडूंचा राणा दांपत्याला इशारा

दरम्यान या प्रकरणात राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही राणा दाम्पत्यावर टीका करताना म्हटले आहे कि ,  प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हा सगळा प्रकार सुरु आहे. शिवसेनेने जे आव्हान दिलं आहे त्यामध्ये आम्हीदेखील त्यांच्यासोबत आहोत. प्रहारचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत असतील. या दांपत्याने  निवडून येताना राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि आता वेगळ्या विचारधारेचा पाठिंबा घेत आहेत. ही मतदारासोबत फार मोठी बेईमानी आहे. ज्या विचारधारेवर निवडून आले ती कायम ठेवली नाही उलट त्यावर आक्रमण करत आहेत. शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या वाटेला गेलात तर काय होईल सांगता येणार नाही,” असा इशाराही  यावेळी बच्चू कडूंनी दिला आहे. “वाघाची नखं अजूनही धारदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं,” असेही यावेळी ते म्हणाले. याठिकाणी अमरावती जिल्ह्यातून शिवसैनिक आणि पदाधिकारीही मोठ्या प्रमाणात आले आहेत.

भाजपच्या मोहित कंबोज यांची गाडी येताच शिवासिनीक धावले

दरम्यान मातोश्रीसमोर संतप्त शिवसैनिकांना जेंव्हा या भागात कलानगर सिग्नलजवळ  भाजपच्या मोहित कंबोज यांची गाडी पाहताच शिवसनिकांनी त्यांच्या गाडीला घेरण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ केली तेंव्हा त्यांच्या वाहनचालकाने मोठ्या शिताफीने त्यांची गाडी गर्दीच्या बाहेर काढून पळवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.  मोहित कंबोज शिवसैनिकांना डिवचण्यासाठी तिथे आले होते तसेच मातोश्री परिसराची ते रेकी करत होते, असे  शिवसैनिकांचं म्हणणे आहे. त्यावर “एक लग्नसोहळा आवरुन मी घरी जात होता. कलानगरला एका सिग्नलवर माझी गाडी थांबली होती. त्यावेळी सेना कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. पोलिस आणि माझ्या सुरक्षा रक्षकांनी मला वाचवलं.  मी कसलीही रेकी करत नव्हतो. मी लग्न समारंभ आटपून  घराकडे निघालेलो असताना शिवसैनिकांनी माझ्या गाडीवर हल्ला केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!