Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या वादाच्या भोवऱ्यात , पदोन्नतीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती

Spread the love

मुंबई : राज्याच्या गृहविभागाने बुधवारी रात्री ३७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढतीचा आदेश काढला होता. यामध्ये मुंबई आणि ठाण्यातल्या पोलीस अधीक्षक आणि उपायुक्तांसह पाच जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली गेली होती. मात्र, आता पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्यात आली आहे. या संदर्भात गृह विभागाने नव्याने आदेश काढले आहेत.

या संदर्भात गृह खात्याने काढलेल्या आदेशात म्हटले  आहे की, निवडश्रेणी पोलीस अधिक्षक दर्जाच्या पदावरुन पोलीस उप महानिरीक्षक दर्जाच्या पदावर पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदरहू आदेशातील खालील पाच भापोसे अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने पदस्थापना आदेशास पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे का नाराज झाले ?

दरम्यान राज्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीच्या निर्णयाला गृहमंत्रालयाने ऐनवेळी स्थगिती दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. यामागील खरे कारण आता समोर आले आहे. गृहमंत्रालयाकडून बुधवारी रात्री बदल्यांचे जे आदेश काढण्यात आले त्यामध्ये मुंबई आणि ठाणे परिसरातील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. पोलीस अधिकारी महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई, मीरा-भाईंदर हद्दीत बदली करण्यात आली.

एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे या परिसरात पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे होती. गृहमंत्रालयाने पालकमंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, गृहखात्याने परस्पर आदेश काढल्याने एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे समजते. यावरून महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

हा निर्णय घेताना विश्वासात न घेतले गेल्याने नाराज मंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ न शकल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेरच्या क्षणी पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली असे सांगण्यात येत आहे. त्यावरून

या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला स्थगिती

या अधिकाऱ्यांमध्ये राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबईचे  उपयुक्त राजेंद्र माने, पदोन्नतीने पदस्थापना – अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग ठाणे शहर, पोलीस उप आयुक्त, मिरा भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयचे महेश पाटील,  पदोन्नतीने पदस्थापना – अप्पर पोलीस आयुक्त (वाहतूक), बृहन्मुंबई,  पोलीस अधिक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे संजय जाधव , पदोन्नतीने पदस्थापना – अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर ,  पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे ,पंजाबराव उगले, पदोन्नतीने पदस्थापना – अप्पर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस (Local Arms), बृहन्मुंबई , पोलीस अधिक्षक, पालघर , दत्तात्रय शिंदे , पदोन्नतीने पदस्थापना – अप्पर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा बृहन्मुंबई यांचा समावेश आहे.

कृष्ण प्रकाश यांच्यासह ३७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

काल गृह मंत्रालयाने नागपूर, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नाशिकमधील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा क्रम वाढत चालला होता. दिवसाढवळ्या गुंड उच्छाद मांडत होते, त्यामुळे कायदा आणि सुरक्षेव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेरीस पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती आता विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.आय.पी सुरक्षा मुंबईत करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!