Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : पोलिसआयुक्तांनी दिलेला स्थानबध्दतेचा आदेश खंडपीठाकडून कायम

Spread the love

औरंगाबाद : कुख्यात आरोपीची स्थानबध्दतेतून सुटकेबाबतची आरोपीची याचिका १२ एप्रिल रोजी खंडपीठाने फेटाळली. आदिलखान नादेरखान असे याच्यावर आॅगस्ट २१ मध्ये   पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी जारी केल्याने बेगमपुरा पोलिसांनी त्याला शोधून त्याची रवानगी हर्सूल मध्यवर्ती कारागृहात केली .

या कारवाईस शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर सल्लागार मंडळाने या प्रकरणात आदिलखानच्या स्थानबध्दतेबाबत औरंगाबाद पोलिसांचे म्हणणे ऐकून घेतले.या प्रकरणात व्हिडीओ काॅन्फरसिंग द्वारे पोलिसआयुक्तालयाकडून सहाय्यक फौजदार द्वारकादास भांगे यांनी स्थानबध्दतेविषयी पोलिसांची बाजू मांडली. सल्लागार मंडळाने सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलिसआयुक्तांनी जारी केलेले आदेश योग्य असल्याचा निर्वाळा सप्टेंबर २१ मध्ये दिला.

दरम्यान आरोपी आदिलखानने स्थानबध्दतेतून मुक्तता मिळवण्यासाठी खंडपीठात धाव घेतली.पण खंडपीठाने आरोपी आदिलखानचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिसआयुक्तांनी स्थानबध्दतेच्या कारवाईचे अवलोकन करुन आदिलखानची एम.पी.डी.ए.तून सुटकेसाठी दाखल केलेली याचिका फेटाळली.या प्रकरणात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आर.डी. सानप यांनी बाजू मांडली.पोलिसउपायुक्त अपर्णा गिते , सहाय्यक पोलिसआयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक फौजदार भांगे यांनी पाठपुरावा केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!