Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraPoliticalUpdate : अल्पसंख्याक लोकांच्या दुकानातून साहित्य घेऊ नका असा फतवा काढणे धर्मांधता : पवारांचा भाजपवर हल्ला

Spread the love

सांगली : धर्म आणि धर्मांधतेच्या केंद्रातील भाजपच्या आणि त्यांच्या विचारसरणीच्या विषमतामूलक राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी वज्राघात केला. देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तसेच, सांगलीत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी कर्नाटकमधील काही समाजघटकांनी अल्पसंख्याकांच्या दुकानातून खरेदी न करण्याच्या केलेल्या आवाहनावर देखील टीका केली आहे.

आपल्या भाषणात पवार म्हणाले कि , “कर्नाटकात भाजपाचं राज्य आहे. तिथे अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या दुकानातून साहित्य घेऊ नका असा फतवा काही संघटनांनी काढला आहे. व्यवसाय कुणीही करू शकतो. व्यवसाय चांगला असेल, व्यवहार चांगला असेल तर त्याचा आदर करण्याची वृत्ती आपल्या समाजात आहे. पण तो अल्पसंख्याक जातीचा आहे म्हणून त्याचा मालच घेऊन नका, अशा प्रकारची कटुता राज्य हातात असणारे घटक करायले लागले, तर सामाजिक ऐक्य कसं ठेवायचं? हा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे या धर्मांध वृत्तींच्या विरोधात देखील आपल्याला लढाई द्यायची आहे”.

गांधी – नेहरूंबद्दल आदराची भावना नाही , हि अस्वस्थ करणारी स्थिती

देशात सध्या धर्माच्या नावाखाली माणसांमध्ये अंतर निर्माण केलं जात असल्याची नाराजी शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवली. “आज देशातलं राजकारण एका वेगळ्या दिशेने जात आहे. राष्ट्र एका वेगळ्या लोकांच्या हातात आहे. महाराष्ट्रातही अनेक कर्तृत्ववान माणसं होऊन गेली. त्यांनी हा देश उभा केला. विकासाचं राजकारण केलं. माणसं जोडण्याचं राजकारण केलं. पण आज देशामध्ये धर्माच्या नावाने माणसांमध्ये अंतर निर्माण केलं जात आहे”, असं सांगून पवार पुढे म्हणाले कि , “महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू ही त्या काळातली नेतृत्वाची पिढी होती. त्यांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट केले. त्यानंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिलं. देशासाठी जे खपले, त्यांच्याबद्दलचा आदर, सन्मान ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टीका-टिप्पणी करणं, यातच धन्यता मानणारं नेतृत्व आज दुर्दैवानं आपल्याला देशात पाहायला मिळतंय. त्यामुळे लोकांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे”, अशा शब्दांत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!