Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यभरात पाडव्याचा उत्साह , मुंबईत मराठी भाषा भवनांचे भूमिपूजन, अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा

Spread the love

मुंबई : मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्राचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं आहे. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, की मातृभाषेचं हे मंदिर उभे राहतंय याचा आनंद आहे. माझ्या आयुष्यातील ही मोठी घटना आहे. कारण मुंबईसाठी माझे आजोबा लढले. मराठीसाठी वडील बाळासाहेब लढले आणि या कार्यक्रमाच्या पाटीवर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव लागले. दरम्यान आज राज्यभरात गुढी पडावा आणि मराठी नूतनवर्ष आनंदाने , उत्साहाच्या वातावरणात साजरे करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , शरद पवार , राहुल गांधी , नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की मराठी भाषेत बोला, असे म्हटले की आमच्यावर टीका होते, मी टीकेला घाबरत नाही. टीका करणाऱ्यांची किंमत मला माहिती आहे, मला त्याची काळजी नाही. जास्तीत जास्त भाषा शिकणं गुन्हा नाही पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये. इंग्रजी आली पाहिजे, इतर भाषेचा मी द्वेष करत नाही, पण मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असंही ते म्हणाले.

मराठी भाषा भवनाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की आपण जे करतोय ते जगातील सर्वोत्तम असायला हवे . हे भवन बघायला जगातून लोक आले पाहिजेत. मराठी विषय शिकवणं सक्तीचं असावं, मराठी पाट्या लावाव्या यासाठी कायदा असावा. शाळेत इंग्रजी आणि घरात मराठी. माझी दोन्ही मुले मराठीतच बोलतात. कारभाराची भाषा मराठी असायला हवी. इतर भाषेंचे आक्रमण नको. सीमाभागात मराठी लोकांवर भाषिक अत्याचार होतोय. हे चालू देणार नाही. त्यांच्या पोटदुखीचा इलाज करायला हवा. ठसा पुसण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला धडा शिकवला जाईल.

महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून, लढून मिळावावी लागली

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, की काही जबाबदाऱ्या पार पाडताना आयुष्याचं सार्थक झाल्याचा आनंद मिळतो. आजची जबाबदारी माझ्यासाठी अशीच माझ्या जीवनाचं सार्थक झाल्याचा आनंद देणारी आहे. मराठी माणूस म्हटलं की संघर्ष आलाच. भाषेनुसार प्रांतरचना झाली मात्र महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून, लढून मिळावावी लागली हा इतिहास आहे. जो इतिहास विसरतो त्याला भविष्य राहात नाही. मुंबईसाठी आजोबा लढले, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले आणि आज मुख्यमंत्री म्हणून माझे नाव या इमारतीच्या भूमिपूजनाच्या पाटीवर लागले यापेक्षा माझ्या जीवनाचे दुसरे सार्थक असूच शकत नाही, असेही ते म्हणाले.

राज्यभरात साजरा होतोय गुढीपाडवा

कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात शोभायात्रा निघू शकल्या नाहीत. आता कोविड 19 संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारनेही सर्व निर्बंध हटवलेत. त्यामुळे दोन वर्षांनंतर मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यात सर्वत्र शोभायात्रा काढून आनंद व्यक्त करण्यात आला. या शोभायात्रांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले असून महिला बाईकस्वार, ध्वज, लेझिम पथक, ढोल-ताशा, रणमैदानी खेळांची प्रत्याक्षिकं इ. सर्व गोष्टी च्या नागरिकांना गेली दोन वर्ष अनुभवता आल्या नव्हत्या त्या करताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो आहे.

मोदींच्या मराठीतून शुभेच्छा

दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्व मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्वीट करत या शुभेच्छा दिल्या आहेत.गुढीपाडव्यानिमित्त ट्वीट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले आहेत की, ‘गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो. आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा

राहुल गांधी , प्रियांका यांच्या शुभेच्छा

शरद पवार , सुप्रिया सुळे , अजित पवार यांच्याही शुभेच्छा

भाजपनेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याही शुभेच्छा

आपलं सरकार

Click to listen highlighted text!