Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : सोशल मीडियावर महिलेची बदनामी , मुंबई पोलिसांनी आरोपीला लखनौवरून उचलले…

Spread the love

मुंबई : सोशल मीडियावर ३५ वर्षांच्या विवाहितेची बदनामी केल्याप्रकरणी सचिन नैनिलाल कनोजिया ऊर्फ भोला (२१) या आरोपीला निर्मलनगर पोलिसांनी लखनौवरून अटक केली आहे. महिलेला धमकावून तिचे छायाचित्र समाजमाध्यमावर व्हायरल केल्याप्रकरणी कनोजियासह त्याच्या एका मित्राविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हि कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पीडित महिला वांद्रे येथे पती, दोन मुले आणि पुतणीसोबत राहते. याच परिसरात आरोपी सचिन राहत होता. दरम्यान काही महिन्यांपूर्वी पीडितेची आणि आरोपीची ओळख झाली होती. या वेळी त्याने त्याच्या गावची ओळख काढून तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. ओळख वाढल्यानंतर आरोपी तिला सतत दूरध्वनी, तसेच व्हिडीओ कॉल करीत होता.त्यावर पुन्हा पुन्हा कॉल करू नकोस असे सांगूनही आरोपी थांबला नाही. उलट फिर्यादी महिलेचे अश्लील चित्रीकरण केल्याचे सांगून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. कनोजिया तिच्याकडे अश्लील फोटो आणि व्हिडीओची मागणी करू लागला.

दरम्यान तिचे अश्लील चित्रीकरण फिर्यादी महिलेचा मुलगा आणि पुतणीला मिळाले होते. हा प्रकार पुतणीकडून समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्यांनी तात्काळ सचिनविरुद्ध निर्मलनगर पोलिसांत तक्रार केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचिनविरुद्ध विनयभंगासह बदनामी करणे आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. तपासादरम्यान सचिन त्याच्या उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच या पथकाने लखनऊ येथून सचिनला गजाआड केले. आरोपीच्या मित्राने महिलेचे चित्रीकरण समाजमाध्यमावर व्हायरल केल्याचे उघड झाल्यानंतर त्याविरोधातही गुन्ह दाखल करण्यात आला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!