Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : दोन आत्महत्या , एक विवाह होत नाही म्हणून तर दुसरी पती तृतीयपंथीयांसोबत राहतो म्हणून….

Spread the love

औरंगाबाद : वेगवेगळ्या कारणावरून आत्महत्येच्या दोन घटना घडल्या असून यापैकी एक घटना विवाह होत नसल्याच्या नैराश्यातून एका युवकाने गळफास घेऊन केली. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर गावातील ही घटना असून,विजय राजेंद्र त्रिभुवन (वय २५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तर दुसऱ्या एका घटनेत पती तृतीयपंथीयांसोबत राहतो म्हणून एका नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. 

पदवीधर असूनही कोणतीही नोकरी मिळत नसल्याने आणि घरची आर्थिक स्थिती बारी नसल्याने कुणीही मुलगी द्यायला तयार नसल्याने विजय गेल्या काही दिवसांपासून निराश झाला होता. तसेच पदवीधर असतानाही विजयला नाईलाजास्तव मोलमजुरी करावी लागत होती. त्यामुळे याच तणावातून त्याने मंगळवारी दुपारी चार वाजेच्यादरम्यान विजयने राहत्या घरात गळफास घेतला. त्याच्या कुटुंबियांना याची माहिती मिळताच त्यांनी टाहो फोडला. विजय घरात मोठा असून, घरच्यांची जवाबदारी त्याच्यावर होती. तसेच एक भाऊ बहीण आणि आई त्याचे कुटुंब होते. त्याच्या जाण्याने घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. सायंकाळी साडेआठ वाजता शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुसरी घटना : पती तृतीयपंथीयांसोबत राहतो म्हणून…

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह होऊनही पती तृतीय पंथियांसोबत राहत असल्याची माहिती मिळाल्याने नवविवाहित तरुणीने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहरातील शिवाजीनगर परिसरातील ही घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पतीच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याची तक्रार तिच्या आईने मंगळवारी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी पतीला अटक केली आहे. गणेश आप्पासाहेब उगले (२६, रा. काबरानगर, गारखेडा) असे आरोपीचे नाव असून तो वाहनचालक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश आणि स्मिता यांचा सहा महिन्यांपूर्वी ( १ नोव्हेंबरला २०२१ ) आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. काही दिवस दोघांच्या संसाराचा व्यवस्थित सुरू होता. परंतु गणेश शिवाजीनगर येथील तृतीयपंथियांसोबत राहत असल्याचे स्मिताला कळाले.दरम्यान आपल्या पतीचे तृतीयपंथियांसोबत राहणे स्मिताला आवडत नसल्याने दोघांमध्ये नेहमी यावरून वाद व्हायचे. कधीकधी गणेश स्मिताला यावरून मारहाण सुद्धा करायचा, असा आरोप आहे.

रविवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे स्मिता रागाच्या भरात रात्रीच घरातून निघून गेली. त्यानंतर सकाळी रेल्वेसमोर उडी घेऊन तिने आत्महत्या केल्याचे समोर आले. स्मिताच्या आत्महत्येला तिचा पती गणेशच कारणीभूत असल्याचा आरोप स्मिताच्या कुटुंबीयांनी केला आहे. यानुसार गणेशच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!