Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : धक्कादायक : औरंगाबादेत आले तब्ब्ल ३७ तलवारींचे कुरिअर

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कुरियरच्या माध्यमातून तब्बल ३७ तलवारी शहरात मागवण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त आहे. पोलिसांच्या धडक कारवाईनंतर हे हे प्रकरण उघडकीस आले आहे.  शहरात कुरिअरने तलवारी आल्याची गुप्त माहिती सहायक पोलिस आयुक्त (शहर विभाग) अशोक थोरात यांना खबऱ्या मार्फत मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तात्काळ याची माहिती क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांना देऊन कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार दराडे यांच्या पथकाने निराला बाजार येथील डीटीडीसी कुरिअरच्या कार्यालयावर छापा टाकला, अशी माहिती आहे.

कुरिअरच्या कार्यालयातील अधिकारी यांच्याकडे विचारणा करण्यात आली. पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच वाढला आणि त्यांनी आलेल्या कुरिअरची तपासणी केली. पार्सल बॉक्समध्ये एक कुकरी आणि ३७ तलवारी आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी तलवारी जप्त करत पुढील कारवाईला सुरू केली. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  आता हे पार्सल कुणी मागवले होते? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. एकूण सात ग्राहकांनी या ३७ तलवारी सात वेगवेगळ्या पत्त्यावर मागवल्या होत्या. यात पाच औरंगाबादचे असून दोघे जालन्याचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!