Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IPL 2022 CSK vs KKR : आयपीएलचा धमाका सुरु… चेन्नईवर मात करीत केकेआरने जिंकला सलामीचा सामना

Spread the love

मुंबई : आयपीएलच्या पंधाराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलंय. चेन्नईने दिलेलं १३२ धावांचं लक्ष्य साध्य करीत  केकेआरने हा सामना जिंकला. केकेआरच्या या विजयासाठी अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स यांनी मोलाची कामगिरी केली असून गतविजेत्या चेन्नईचा  यावेळी केकेआरने पहिल्याच सामन्यात पराभव केला. 

नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान फलंदाजीसाठी आलेले चेन्नईचे खेळाडू मैदानावर फार काही चांगली कामगिरी करू शकले  नाहीत. चेन्नईने केकेआरसमोर वीस षटकांत १३१ धावांचे लक्ष्य  ठेवले. हे आव्हान स्वीकारत केकेआरच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला. केकेआरच्या अजिंक्य रहाणेने ३४ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४४ धावा केल्या. त्यानंतर व्यंकटेश अय्यरने १६ चेंडूंमध्ये १६ धावा करत संघाला विजयाची वाट करुन दिली. सॅम बिलिंग्सने २२ चेंडूंमध्ये २५ धावा तर नितीश राणाने १७ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या.

चेन्नई संघाची निराशाजनक कामगिरी

सामन्याच्या प्रारंभी  फलंदाजीसाठी उतरलेल्या  गतविजेत्या  चेन्नई संघाची कामगिरी सलामीलाच निराशाजनक राहिली.  ऑरेंज कॅप मिळवणारा ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर चेन्नईचा कोणताही फलंजाद मैदानावर जास्त वेळ तग धरू शकला नाही. ऋतुराजनंतर डेव्हॉन कॉन्वेच्या रुपात चेन्नईला २८ धावांवर दुसरा झटका बसला. त्यानंतर रॉबिन उथप्पाने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र लय सापडण्याआधीच उथप्पाला वरुण चक्रवर्तीने २८ धावांवर बाद केले. त्यानंतर ६१ धावा होईपर्यंत चेन्नईचे पाच गडी बाद झाले. अंबाती रायडू १५ धावांवर बाद झाला. तर शिवम दुबे अवघा ३ धावा करुन तंबुत परतला. मात्र महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जाडेजा या जोडीने संघाला सावरत केकेआरसमोर कसेबसे १३२ धावांचे आव्हान उभे केले.

रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने चांगला खेळ करत संघाला सावरलं. धोनीने मोठे फटके लगावत ३८ चेंडूंमध्ये आपले अर्धशकत पूर्ण केले. तर रविंद्र जाडेजाने धोनीला साथ धेत २८ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या. या दोघांनी ७० धावांची भागिदारी करत संघाचा धावफलक १३१ धावापर्यंत नेऊन पोहोचवला. मात्र १३१ धावांचे लक्ष्य केकेआरने साध्य करीत  सहा गडी राखून चेन्नईचा पराभव केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!