Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndianMovieNewsUpdate : ‘आरआरआर’ ने केवळ भारतालाच नव्हे तर जगालाही लावले वेड , पहिल्या दिवसाची कमाई पाहून तुम्हीही व्हाल थक्क !!

Spread the love

मुंबई : आपल्याकडे आधी झुंड , गंगुबाई काठियावाडी  आणि राजकीय दृष्ट्या काश्मीर फाईलने धुमाकूळ घातल्याचा बातम्या असल्या तरी या चर्चांना पूर्ण विराम देत ‘बाहुबली’ फेम एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’  या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल २०० कोटींची कमाई केली असल्याचे वृत्त आहे. अभिनेते राम चरण आणि ज्युनियर एनटीआरने या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे ‘पुष्पा’, ‘ जय भीम’ ‘झुंड, काश्मीर फाईल , गंगुबाई  नंतर सोशल मीडियावरही या चित्रपटाने युजर्सना तर वेड लावलेच आहे परंतु भारतीय सिनेरसिकांबरोबरच परदेशी प्रेक्षकांनाही या चित्रपटाने आपल्याकडे वाळवून घेतले असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. देशी विदेशी बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.


बाहुबली फेम दाक्षिणात्य सिने दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ‘आर आर आर’ हा पूर्णतःअॅक्शनपट  असून तो काल २५  मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाच्या  हिंदी व्हर्जनने १८ कोटींची कमाई केली आहे. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या मते, ‘आरआरआर’ने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिकेत धडाकेबाज ओपनिंग केली आहे.

असे सांगितले जात आहे कि , अमेरिकन सुपरहिरो चित्रपट ‘द बॅटमॅन’ लासुद्धा आरआरआर’ने मात दिली असून विदेशी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ‘नंबर वन’ बनला आहे. उपलब्ध माहितीनुसार या चित्रपटाने ऑस्ट्रेलियात ४.०३ कोटी, न्यूझीलंडमध्ये ३७.०७ लाख आणि अमेरिकेत ३८ कोटींहून अधिक कमाई केली असून या चित्रपटाने साऊथमध्ये १०० कोटींहुन अधिक कमाई केली आहे. एकूण या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०० कोटींचा आकडा पार केला आहे.

जाणून घ्या चित्रपटाविषयी…

RRR म्हणजे रौद्रम , रणम, आणि  रुधिराम असे याचे पूर्ण नाव आहे. ‘ राइज राइज रिव्हॉल्ट ‘  हा एसएस राजामौली लिखित आणि दिग्दर्शित २०२१ चा भारतीय तेलुगु-भाषेतील अॅक्शन चित्रपट आहे. यात एनटी रामाराव ज्युनियर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

1920 चे कथानक आहे . यामध्ये ब्रिटीश जनरल स्कॉट आणि त्यांची पत्नी आदिलाबाद जिल्ह्याला भेट देतात आणि दिल्लीत त्यांची दासी म्हणून काम करण्यासाठी मल्ली या गोंड आदिवासी मुलीला जबरदस्तीने घेऊन जातात. मुलीला वाचवण्यासाठी कोमाराम भीम आपल्या माणसांसोबत दिल्लीला पोहोचतो त्यांच्या या मोहिमेला मदत करण्यासाठी ते जंगलात एक जंगली वाघ पकडतात. हैदराबादच्या निजामने स्कॉटच्या कार्यालयाला याची माहिती दिलेली असते.

या चित्रपटात अल्लुरी सीता रामा राजू हा एक पोलिस अधिकारी आहे जो साम्राज्याची सेवा करण्याची क्षमता सिद्ध करतो. गोंड टोळीच्या नेत्याला जिवंत पकडणाऱ्या अधिकाऱ्याला लेडी बक्सटन प्रमोशनची ऑफर देते तेव्हा राम पुढे येतो. शेवटी ते सीता, जेनिफर आणि इतरांसोबत पुन्हा एकत्र येतात. रामच्या आग्रहास्तव, भीम त्याला शिक्षित करून उपकार परत करण्याची विनंती करतो. राम आपल्या गावी परततो आणि वचन दिल्याप्रमाणे शस्त्रे देतो तर भीम आपल्या गावात परततो आणि मल्ली तिच्या आईकडे सुखरूप परत येते अशी हि रोमांचित करणारी कथा आहे.

अशा आहेत भूमिका

या चित्रपटात कोमाराम भीमच्या भूमिकेत एनटी रामाराव ज्युनियर असून हा  तेलंगणातील एक गोंड आदिवासी नेता आहे ज्याने हैदराबाद राज्याच्या मुक्तीसाठी हैदराबादच्या निजामाविरुद्ध लढा दिला , अल्लुरी सीताराम राजूच्या भूमिकेत राम चरण असून आंध्र प्रदेशातील तो एक स्वातंत्र्य योद्धा आणि आदिवासी नेता दाखवला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग होता, ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्याने लढा दिला., वरुण बुद्धदेव याने तरुण अल्लुरी सीताराम राजुची भूमिका केली आहे तर अजय देवगण वेंकट रामा राजूच्या भूमिकेत आहे. सीतेच्या भूमिकेत आलिया भट्ट,  स्कॉट च्या भूमिकेत  रे स्टीव्हनसन , जेनिफरच्या भूमिकेत ऑलिव्हिया मॉरिस आणि लेडी स्कॉटच्या भूमिकेत अॅलिसन डूडी यांनी काम केले आहे. त्याचबरोबर भीमचा साथीदार म्हणून मकरंद देशपांडे यांनी काम केले आहे.

या चित्रपटाचे मुख्य छायाचित्रण १९ नोव्हेंबर २०१८ रोजी हैदराबादमध्ये सुरू झाले होते. पहिल्या शेड्यूलमध्ये अॅल्युमिनियम फॅक्टरी, हैदराबाद येथे सेट केलेल्या अॅक्शन सीक्वेन्सचा समावेश होता. वडोदरा येथेही या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटातून अभिनेता अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनी पहिल्यांदाच दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटाचे टायटल आणि मोशन पोस्टरचे अनावरण २५ मार्च २०२० रोजी करण्यात आले होते. हा चित्रपट आधी ३० जुलै २०२० रोजी रिलीज होणार होता. तथापि, ५ फेब्रुवारी २०२०  रोजी, ७ जानेवारी २०२२ ही नवीन प्रकाशन तारीख जाहीर करण्यात आली परंतु आता हा चित्रपट २५ मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!