Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

India Cricket Update : चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी आता रवींद्र जडेजावर , धोनी पायउतार

Spread the love

मुंबई :  चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने  संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला असून आता चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी अष्टपैलू खेळाडू  रवींद्र जडेजावर सोपविल्याचे वृत्त आहे. २०१२ पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अविभाज्य भाग असलेला रविंद्र जडेजा सीएसकेचं नेतृत्त्व करणारा तिसरा खेळाडू आहे. दरम्यान धोनीनं कर्णधारपद सोडण्याचा  निर्णय घेतला असला तरी चेन्नईच्या संघासाठी तो पुढेही खेळणार  असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्सची पहिली मॅच शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध शनिवारी होणार आहे. आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत धोनीने दोन वेळा आयपीएल जिंकली होती. आयपीएल २०२१ मध्ये जडेजा चांगलाच फॉर्मात होता. त्याने १६ मॅचमध्ये २२७ रन  करून १३ विकेट्स घेतल्या होत्या.  बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये त्याने आपले योगदान दिले आहे. आयपीएल २०२२ पूर्वी चेन्नईने  चार खेळाडूंना रिटेन केले. त्यामध्ये टीम इंडियाचा ऑल राऊंडर म्हणून जडेजाचं नाव पहिल्या क्रमांकावर होते. जडेजाला चेन्नईने  १६ कोटींना तर धोनीला १२ कोटींमध्ये रिटेन केले. धोनीने  स्वत:च  जडेजासाठी पहिला क्रमांक सोडला होता. त्यानंतर जडेजाच सीएसकेचा भावी कॅप्टन असेल, असा अंदाज करण्यात येत होता. दरम्यान आयपीएल स्पर्धेपूर्वी तो अंदाज खरा ठरला आहे.

महेंद्रसिंह धोनी आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनपासून चेन्नईचा कॅप्टन होता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये काही मॅचमध्ये सुरेश रैनानं चेन्नईचे कॅप्टनपद सांभाळले होते. पण धोनीनंतर चेन्नईचा पहिला पूर्णवेळ कॅप्टन म्हणून जडेजाची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएल इतिहासातील यशस्वी कॅप्टनमध्ये धोनीची नोंद होते. त्याच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेने  चार वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. तसेच सर्व टीममध्ये चेन्नईच्या विजयाची टक्केवारी ही सर्वात जास्त म्हणजेच ६४.८३ टक्के आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!