Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SportsNewsUpdate : घोड दौड स्पर्धेत येथील डॉ. संकेत दिलीप अलोणे यांना रौप्य पदक

Spread the love

वणी : जिनियस अश्व प्रेमी संघ मुंबईच्या वतीने सफाळा बीच मुंबई येथे आयोजित 20 कि.मीच्या घोड दौड स्पर्धेत येथील डॉ. संकेत दिलीप अलोणे यांनी सहभाग घेत द्वितीय क्रमांक प्राप्त करीत रौप्यपदक प्राप्त केले.व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रात असून ते अश्वप्रेमी म्हणून सुपरिचित आहेत. पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होत त्यांनी सहभागी 70 स्पर्धकांत दुसरे स्थान पटकावून त्यांनी हे यश मिळवले. विशेष म्हणजे विदर्भातून ते एकमेव स्पर्धक होते. ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनात ‘अल – उबेद’ या घोड्यावर त्यांनी ही दौड मारली. संघाचे अध्यक्ष अजय नेमसे व सचिव खुषरू पटेल यांच्या हस्ते डॉ. संकेत यांना रौप्यपदक व प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांच्या या साहसाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!