Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : सांस्कृतिक : अचलेरचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी सुरु

Spread the love

महेश गायकवाड/ सोलापूर


उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि लोहारा तालुक्यातील अचलेर चे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा येत्या गुडी पाडव्याला संपन्न होणार असून अचलेर येथे ग्रामदैवताच्या यात्रेची जय्यत तयारी आज पासून सुरू झाली आहे. दर वर्षाप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय आज झालेल्या पंच कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.


अचलेर येथील श्री मल्लीकार्जून पंच कमिटी यांच्या तर्फे आज ग्रामपंचायत कार्यालय येथे यात्रेसंबंधी बैठक बोलावण्यात आली होती,या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. आणि नेहमी प्रमाणे यात्रा उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. याच वेळी श्री मल्लिकार्जुन यात्रा कमिटीच्या देणगी पेटी चे विधिवत पुजन श्री ईरय्या स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले .

यावेळी पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीमंत कंटे, वसंतराव गोपणे , जयसिंगदादा बायस , विश्वनाथ पाटील , बंडूसिंग गहलोत ,अचलेर नगरीचे सरपंच प्रकाश लोखंडे , उपसरपंच प्रतिनिधी दिलीपराव माळगे ,संदीप पाटील, मल्लिनाथ माळगे , इराय्या स्वामी , श्रीशैल पुजारी , राजु माळगे ,बाबुराव हविले , जगदीश सुरवसे , व समस्त अचलेर चे ग्रामस्थ या उपस्थित होते. देणगी पेटीचे पुजन झाल्यानंतर देणगीपेटी ग्रामपंचायत कार्यालय येथे आणण्यात आली व तेथुन देणगी गोळा करण्यास प्रारंभ करण्यात आला. श्री मल्लिकार्जुन देवाची ही यात्रा पाच दिवस चालत असते.

पाच दिवस विविध कार्यक्रम

या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतात, ही यात्रा शुक्रवार दि 1 एप्रिल पासुन ते मंगळवार दिनांक 5 एप्रिल पर्यंत चालणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस शनिवार दिनांक 2 एप्रिल ला गुडी पाडव्याच्या दिवशी आहे, या दिवशी पहाटे श्री मल्लिकार्जुन देवाला दुग्धाभिषेक करण्यात येतो, नंतर ग्रामस्थांचे दंडवत, नवस फेडणे हे कार्यक्रम दिवसभर सुरू राहतात तर दुपारी ठीक 4 वाजता विविध वाद्यांच्या गजरात आणि हालगी व तुतारींच्या व ढोल ताशांच्या साक्षीने गावातील विरक्त मठातुन श्री ची पालखी निलगंगेच्या डोंगरात असलेल्या मंदिराकडे जण्यासाठी निघते, यावेळी यात्रेमध्ये मुख्य मान असलेली शंभू महादेवाची कावड भीमनगर येथुन कै. शंकर साधू गायकवाड यांच्या घरातुन त्यांची मुलांच्या यजमानांखाली भव्य अशा भगव्या पताका आणि मोठ्या जळकुंभास ह यात्रेत सहभागी होते ही कावड ज्या क्षणी गावातील विरक्त मठाजवळ पोहचते त्याच क्षणी यात्रेला प्रारंभ होतो,

यात्रेनिमीत्त होणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेची पुजन जीवनदादा गहीलोत यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी गुुरूसिंगदादा बायस , अमोल मदने , भिम सुतार , दयानंद माळगे , प्रतापसिंहदादा गहीलोत , तसेच देवस्थान पंच कमिटी व गावातील मित्र मंडळ व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. श्री मल्लिकार्जुन यात्रा पंच कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले की , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष ही यात्रा साजरा करण्यात आली नव्हती तरी यावर्षी ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे, तरी सर्व ग्रामस्थांनी यात सहभागी व्हावे .व देणगी रुपात सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

अचलेर व पंचक्रोशीतील तसेच बाहेर गावी असलेले सर्वच नागरिक , मित्र मंडळ व भक्तगण या सर्वांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन ही यात्रा मोठ्या आनंदाने , व उत्साहाने पार पाडण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंतीही श्री मल्लीकार्जून पंच कमिटी व समस्त अचलेर ग्रामस्थ यांच्या तर्फे करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!