Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NewsInTrending : ‘द काश्मीर फाईल्स’ : तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांच्या ‘या’ विधानाची होत आहे चर्चा …!!

Spread the love

नवी दिल्ली : “द काश्मीर फाईल्स” चित्रपटाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्य जाणून घ्यायची भूक आहे, त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिलाच पाहिजे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे. या  निमित्ताने होणाऱ्या चर्चेवर पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि सध्याचे तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी उपरोधात्मक टिका केली आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.


आपल्या ट्विटमध्ये सिन्हा यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे कि , ”संसदेत कायदा संमत करुन हा चित्रपट न पाहणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद करायला हवी. केवळ संपू्र्ण भारतात हा चित्रपट टॅक्स फ्री करुन चालणार नाही, तर प्रत्येक भारतीयास हा चित्रपट पाहणे बंधनकारक करायला हवे,” असेही सिन्हा यांनी ट्विट करुन म्हटले. तसेच, काश्मीर फाईल्स हा चित्रपट न पाहणाऱ्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि या चित्रपटावर टिका करणाऱ्यांना जन्मठेप करण्यात यावी.

मोहन भागवत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भागवत यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाबाबतचे मत मांडले. सध्याच्या घडीला या चित्रपटाचे समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट  चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच हा चित्रपट पाहण्याचे  आवाहन केले  होते. त्यानंतर, आता तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी मोठं विधान केले आहे.

पंतप्रधान द काश्मीर फाईल्स’ च्या पाठीशी

दरम्यान,  देशातील बहुतांश भाजपा शासित राज्यांमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यातच आता भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या सिनेमावर भाष्य केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, द काश्मीर फाईल्ससारखे सिनेमे बनायला हवेत. अशा सिनेमातून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणले  जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत असा टोला त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!