Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : इस्टेट एजन्टला लुटले , महिलेसहित तिघांना ८ तासात बेड्या, पावशेर सोने जप्त

Spread the love

औरंगाबाद- रियल इस्टेट एजन्टशी सम्बद्ध वाढवून त्याची सुपारी देत लूटमार करणाऱ्या महिलेसहित तिघांना गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्याकडून  १०९. ८४ ग्रॅम सोने जप्त केले आहे.  या प्रकरणात क्रांतिचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  रोहित विठठ्ल बोर्डे रा. फुलेनगर,  उस्मानपुरा, विवेक अनिल गंगावणे (१९) उस्मानपुरा, नदिमखान नजीरखान रा. शहानूरवाडी अशी अटक आरोपींची  नावे आहेत.


या प्रकरणात इस्टेट एजन्ट अशोक शन्कर पाटील रा.छावणी परिसर यांचे समर्थनगर मध्ये स्कायलाईन पार्क बिल्डिंग  येथे मोहटाई रियल इस्टेट नावाचे कार्यालय आहे. यांच्याशी आरोपी महिलेने  हिने ओळख वाढवली. अशोक पाटील यांना सोन्याचे दागिने वापरण्याचा शौक आहे. त्यांच्या गळ्यात १२ तोळे सोन्याच्या चैन  होत्या. त्यानंतर रचनाने सुपारी मिळवून देणाऱ्या नदीमखांशी संपर्क करत रोहित बोर्डे आणि विवेक गंगावने यांच्याशी संपर्क केला. अशोक पाटलाला लूटमार केल्या नंतर लुटलेल्या सोन्यापैकी, ४० टक्के रचना व उर्वरित ६० % मध्ये तिघांचा वाटा ठरला होता. त्यानुसार आरोपी महिला  ही बुधवारी दुपारी अशोक पाटील यांच्या कार्यालयात दुपारी २ वा. पोहोचली थोड्यावेळाने आरोपी रोहित व विवेक आले व अशोक पाटील यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील १२ तोळे सोन्याच्या पाटील यांच्य गळ्यातील चैन हिसकाऊन पोबारा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यांनतर एपीआय मनोज शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली

असा उघडकीस आला गुन्हा

आरोपीनी लूटमार करून फरार झाल्यावर काही क्षणात मास्टरमाइंड महिला  निघून गेली याच घटनाक्रमावरून तिला चौकशी साठी ताब्यात घेताच तिने गुन्ह्याची कबुली दिली त्यांनतर आरोपी रोहित, नदीम , विवेक यांच्या राहत्या घरातून गुन्हेशाखेने त्यांना ताब्यात घेतले. नदीम हा याप्रकरणात मध्यस्थाची भूमिका पार पाडत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले, आरोपीच्या ताब्यातून हिसकावलेल्या चैन जप्त करण्यात आल्या . वरील कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्तां , उपायुक्त अपर्णाला गीते, उजवला वनकर सहाय्य्क पोलीस आयुक्त विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनोज शिंदे , पोलीस कर्मचारी गीता ढाकणे, नितीन धुळे,नितीन देशमुख, संदीप बीडकर यांनी पार पाडली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!