Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MPSC 2022NewsUpdate : राज्य सेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची सूचना जारी ….

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अलीकडेच त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर एमपीएससी २०२२ चे तात्पुरते वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. एमपीएससी पात्रता निकष २०२२ नुसार, एमपीएससी २०२२ परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी  आरक्षित वर्गातील उमेदवार वगळता  सर्वसाधारण उमेदवारांची वयोमर्यादा १९ ते ३८ वर्षे आहे.  एमपीएससी २०२२च्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र होण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे  आवश्यक आहे तसेच  मराठी भाषेत प्रावीण्य असंणे आवश्यक आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी अनुमती असलेल्या प्रयत्नांची संख्या ६ आहे तर ओबीसी  उमेदवार एमपीएससी परीक्षेत एकूण ९ वेळा प्रयत्न करू शकतात. अनुसूचित जाती , जमाती  प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमाप्रमाणे कोटीही अट नाही.


MPSC 2022 परीक्षेच्या तारखा

एमपीएससी परीक्षा वेळापत्रक २०२२ मध्ये एमपीएससी राज्यसेवा 2022 परीक्षा, एमपीएससी एकत्रित परीक्षा २०२१ आणि २०२२ सोबत इतर परीक्षांच्या तारखा समाविष्ट आहेत. एमपीएससी परीक्षेच्या काही महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत

  • MPSC १६ एप्रिल २०२२रोजी उपनिरीक्षक मर्यादित विभागीय २०२२ स्पर्धा पूर्व परीक्षा आयोजित करेल.
  • MPSC राज्यसेवा २०२१ मुख्य परीक्षा ७, ८,९ मे २०२२ रोजी होणार आहे.
  • MPSC राज्यसेवा २०२२ ची प्रिलिम्स परीक्षा १९ जून २०२२ रोजी होणार आहे आणि मुख्य परीक्षा १५, १६, १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होणे अपेक्षित आहे.
  • MPSC एकत्रित परीक्षा २०२२ अधिसूचना जून २०२२ मध्ये निघणे अपेक्षित आहे आणि आयोगाने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी एमपीएससी  एकत्रित पूर्व परीक्षा २०२२ आयोजित करणे अपेक्षित आहे.
  • MPSC एकत्रित मुख्य पेपर १- २०२१ ची परीक्षा ०९ जुलै २०२२ रोजी होणार आहे.
  • MPSC एकत्रित मुख्य पेपर २ –  पोलीस उपनिरीक्षक २०२१ परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी होणार आहे.
  • MPSC राज्य कर निरीक्षक मुख्य पेपर २- २०२१ आयोगाद्वारे २४ जुलै २०२२ रोजी घेण्यात येईल. त्याची अधिसूचना २८ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
  • MPSC एकत्रित मुख्य परीक्षा २०२१ चा पेपर २-  सहाय्यक विभाग अधिकाऱ्यासाठी ३१ जुलै २०२२ रोजी होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग थेट सेवा भरतीद्वारे तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कृषी सेवक, शिपाई, पोलीस भरती, आरोग्य भरती, म्हाडा भरती इत्यादी विविध विभागांमधील ३० हून अधिक पदं भरतं. एमपीएससीवर नमूद केलेल्या पदांसाठी वर्षभर वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध करते आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच भरती करते. महाराष्ट्र तलाठी भारती २०२२ ची लेखी परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये घेणे अपेक्षित आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!