Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आले हे जेष्ठ साहित्यिक आणि सेवानिवृत्त अधिकारी !!

Spread the love

सोलापूर : पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले जेष्ठ साहित्यिक आणि सेवानिवृत्त अधिकारी एम. जी. भगत अत्यंत दयनीय अवस्थेत रस्त्याच्या कडेला लोकांना आढळून आल्यानंतर त्यांना येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. भगत यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. एका ज्येष्ठ साहित्यिकाची अशी अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला.


याबाबत प्रसिद्ध झलेल्या वृत्तानुसार पंढरपूरमध्ये भक्ती मार्ग परिसरात गुरुवारी एक व्यक्ती इंग्रजीत बोलून आजूबाजूच्या लोकांकडे मदतीसाठी याचना करताना पाहायला मिळाली. त्याचे लोकांना आश्चर्य वाटले. दरम्यान याची माहिती मिळताच रॉबिनहूड सामाजिक संघटनेचे स्वयंसेवक दिवाण आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले आणि आणि त्यांनी या व्यक्तीशी चर्चा केली तेंव्हा त्यांची ओळख पटली. “Will you please arrange me 50 rupees? I will pay back.’, ‘मला एक टॉवेल खरेदी करायचा आहे की जेणेकरून मी आंघोळ करू शकेल.’ अशी विनवणी भागात या भागात करताना आढळून आले. दरम्यान थोडेफार भानावर येत भगत यांनी सांगितले की, ‘मी वर्ध्याचा रहिवासी आहे. पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी रेल्वेने निघालो होतो. प्रवासावेळी मोबाईल, सामान आणि पैसे गायब झाले, काही कळले नाही. माझ्या हातापायाला दुखापत झाली आहे. मला हालचाल करता येत नाहीय. तीन दिवस मी रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्यावर पडून आहे.’

भगत यांनी पुढे सांगितले की, माझी शुद्ध हरपून गेली. लोक मला भिकारी समजून अन्न, पाणी देतात. मात्र, त्यांना काही सांगण्याइतका त्राणही माझ्यात नव्हता. एका ज्येष्ठ साहित्यिकाची अशी अवस्था होणे, हे फार धक्कादायक आहे. विशेष म्हणजे एमजी भागात हे मोठे लेखक असून त्यांची पुस्तके एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात तसेच Amazon सारख्या ऑनलाईन वेबसाईटवरही उपलब्ध आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिल्ली येथील त्यांच्या कुटुंबियांना त्यांची माहिती दिली आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांचे कुटुंबीय शोध घेत होते . अखेर त्यांचा शोध लागल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!